व्यवसाय करू इच्छिणार्‍यांसाठी खुशखबर ! आता किराणा दुकान, रेस्टॉरंट उघडणे अधिक सोपे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता देशात दुकान आणि रेस्टोरंट चालू करणे सोप्पे होणार आहे. मोदी सरकार दुकान आणि रेस्टोरंट उघडण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या परवान्यांना कमी करण्याचा विचार करत आहे. सध्या दुकान आणि रेस्टोरंट चालू करण्यासाठी २८ परवान्यांची गरज लागते. या अर्ज आणि मंजुरी व्यवहाराला कमी करण्यासाठी सरकार सिंगल विंडो सिस्टीम सारख्या पर्यायाचा शोध घेत आहे.

किराणा दुकान सुरु करण्यासाठी करावे लागतात एवढे अर्ज

चालू परिस्थितीत किराणा दुकान काढण्यासाठी २८ अर्ज करून त्यांना मंजुरी मिळवणे गरजेचे आहे. यामध्ये GST रजिस्ट्रेशन पासून ते शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट नुसार परवानगी घेण्याबरोबर वेट अँड मेजर विभागाकडून कीटकनाशक आणि इतर गोष्टींसाठी परवानगी घ्यावी लागते.

एक रेस्टोरंट चालू करण्यासाठी १७ परवान्यांची गरज

एक हॉटेल किंवा रेस्टोरंट काढण्यासाठी १७ परवान्यांची गरज लागते. यामध्ये आगीसाठी NOC, स्थानिक नगर संस्थांकडून परवानगी तसेच गाणी वाजीविण्यासाठी परवाना इत्यांदीची गरज लागते. याशिवाय फूड रेग्युलेटर FSSAI आणि आरोग्य विभाग यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते. चीन आणि सिंगापूरसारख्या देशात मात्र ४ परवान्यांची गरज लागते.

परवाना नूतनीकरण प्रक्रिया बंद करण्याचा विचार

डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ऐंड रिटेल ट्रेड (DPIIT) करणाऱ्या हा विभाग परवाना नूतनीकरण प्रक्रिया बंद करण्याचा देखील विचार करत आहे. छोटा धंदात लोकांना पुन्हा पुन्हा सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नये हा या विचारामागील हेतू आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव 

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो 

“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त 

बाहेर जेवण करणे ठरू शकते मधुमेहाला निमंत्रण