तुम्ही किचनमध्ये ‘स्वादिष्ट’ पदार्थ बनवण्यात ‘मास्टर’ असाल तर दररोज घरबसल्या ‘एवढे’ पैसे ‘कमवा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला स्वादिष्ट जेवण बनवता येत असेल आणि त्यामधून तुम्हाला कमाई कार्याची असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नोयडामधील ई-कॉमर्स स्टार्टअप होमफूडी ने भारतातील पहिले होम मेड अन्न पुरवण्याचे मोबाईल ऍप सुरु केले आहे. या माध्यमातून महिला कमाई करू शकतात. संतुलित आणि रुचकर अन्न नागरिकांना पुरवणे हे या कंपनीचे उद्दिष्ट असून यासाठी त्यांनी हे ऍप सुरु केले आहे.

100 हुन अधिक जण जोडले
सध्या या ऍपबरोबर 100 हुन अधिक शेफ जोडले गेले असून दिवाळीच्या दिवशी हे सर्वजण लाईव्ह कार्यक्रमात अन्न तयार करणार आहेत. पुढील वर्षभरात 1 लाख शेफ जोडण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. होमफूडी अ‍ॅपवर प्रत्येक शेफची स्वतःची रेसिपी उपलब्ध असून या माध्यमातून ग्राहकांना रुचकर अन्न पुरवले जणार आहे.

काय बिजनेस मोडेल ?
होमफूडी प्रत्येक शेफला आपल्या पद्धतीने अन्न बनवण्याची संधी देते. त्याचबरोबर विविध ग्राहक देखील त्यांच्याशी जोडले जाऊन त्यांना कमाईची संधी देखील मिळते. कंपनीने यासाठी दोन अ‍ॅप्लिकेशन बनवले असून एक शेफ ऐप आणि एक कस्टमर ऐप अशी दोन अ‍ॅप बनवले आहेत. सुरुवातीला होमफूडीची टीम सर्व शेफच्या घरी जाऊन त्यांच्या अन्नाची गुणवत्ता तसेच साफसफाईची पाहणी करेल. त्यानंतर त्यांना या अ‍ॅपवर अन्न विकण्याची संधी मिळेल. मात्र यामधून शेफला काही हिस्सा हा कंपनीला द्यावा लागणार असून याचा मात्र खुलासा झालेला नाही.

आपल्या मर्जीने करणार काम
या अ‍ॅपच्या माध्यमातून मेन्यू, किंमत, ऑर्डर टाईम या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर डिलिव्हरी कोणत्या ठिकाणी द्यायची आहे हे देखील तुम्ही ठरवू शकता. त्याचबरोबर पुढील काही दिवसांसाठी तुम्हाला ऑर्डर द्यायची असल्यास याची सोया देखील या ऍपमध्ये करण्यात आली आहे. होमफूडीचे संस्थापक नरेंद्र सिंह दहिया यांनी याविषयी बोलताना सांगितले कि, देशातील सर्व महिलांना रोजगार देणे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे महिला सशक्तीकरण होऊन देश बळकट होईल.

9 टक्क्यांनी वाढत आहे इंडियन फूड सर्विस इंडस्ट्री
एका रिपोर्टनुसार सध्या इंडियन फूड सर्विस इंडस्ट्री 9 टक्क्यांनी वाढत असून 2018-19 मध्ये याची उलाढाल 4.24 लाख कोटी रुपये होती जी 2022-23 पर्यंत 6 लाख कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. या माध्यमातून भारतातील जवळपास 75 लाख जणांना रोजगार उपलब्ध होतो.

Visit : Policenama.com