फक्‍त 2 लाख गुंतवून करा ‘हा’ व्यवसाय, दरमहा कमवा काही लाख रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपासून केंद्र सरकारने सिंगल युज्ड प्लॅस्टिकवरील वापरावर बंदी आणली आहे. तसेच त्यापासून तयार केल्या जाणाऱ्या गोष्टींवर देखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात याला पर्याय म्हणून अनेक वस्तू भारतीय बाजारामध्ये येणार आहेत. जर तुम्ही कोणता नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत साल तर तुमच्यासाठी आम्ही नवीन व्यवसायाची कल्पना घेऊन आलो आहोत. बांबूपासून तयार होणाऱ्या या वस्तूंच्या व्यवसायाविषयी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन आणि माहिती देणार आहोत.

इतकी करावी लागणार गुंतवणूक
1.95 लाख रुपये गुंतवणूक करून तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करू शकता. यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण गरजेचे देखील नाही. मात्र हाच व्यवसाय तुम्हाला मोठ्या प्रमाणात सुरु करायचा असल्यास गुंतवणुकीची रक्कम देखील वाढणार आहे. आजकाल लोकं घरातील सजावटीसाठी बांबूच्या विविध वस्तूंचा वापर करत असतात. सोफे, खुर्च्या तसेच विविध वस्तूंचा वापर नागरिक घर सजवण्यासाठी करत असतात.

नितीन गडकरी यांनी केले बांबूच्या बाटलीचे उद्घाटन
काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बांबूपासून बनवलेल्या बाटलीचे उद्घाटन केले. 750 एमएल क्षमतेच्या या बाटलीची किंमत हि ३०० रुपयांपासून सुरु होणार आहे. त्यामुळे टिकाऊ वस्तूंसह पर्यावरणाचे देखील रक्षण यामुळे होणार आहे.

कुठे किती खर्च
तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी खादी ग्रामोद्योग मधून जवळपास १ लाख ७० हजार रुपयांचा कच्चा माल विकत घ्यावा लागेल.

   या ठिकाणी क्लीक करून अधिक माहिती मिळवा
(https://www.kviconline.gov.in/pmegp/pmegpweb/docs/commonprojectprofile/BAMBOO%20ARTICLE%20MANUFACTURING%20UNIT.pdf).

 

Visit : Policenama.com