‘या’ पध्दतीनं मिळवा गायीच्या शेणापासून लाखो रूपये, जाणून घ्या

मुंबई : प्रत्येकाचे स्वप्न असते कि आपला स्वतःचा व्यवसाय असावा. पण त्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. परंतु या पेक्षा कमी मेहनतीत तगडी कमाई करु शकणाऱ्या व्यवसायाची माहिती असणे आवश्यक असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाची माहिती देणार आहोत. विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारकडूनही तुम्हाला सहाय्य मिळेल.

गायीचे शेण अनेक चांगल्या गोष्टी बनवण्यासाठी उपयुक्त ठरतं. शेणाचा योग्य वापर केल्यास चांगली कमाई करता येऊ शकते. गायीच्या शेणापासून कागद, पेंटही बनवले जाते. खादी ग्रामोद्योग विभागाने गायीच्या शेणापासून वैदिक पेंट बनवले जाते. जाणून घेऊया गायीच्या शेणापासून कशी कमाई करता येईल.

गायीच्या शेणापासून कागदाचा व्यवसाय
शेणापासून कागदनिर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूटमध्ये गायीच्या शेणापासून कागदनिर्मितीची पद्धत शोधण्यात आली. शेणापासून हँडमेड पेपर तयार केला जातो. या कागदाचा दर्जाही चांगला असतो. विशेष म्हणजे यापासून कॅरीबॅगही तयार केली जाते. प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी येत असताना कागदी पिशव्या हा चांगला पर्याय ठरत आहे. त्यामुळे गायीच्या शेणापासून कागद तयार करण्याचा व्यवसाय तुम्ही सुरु करु शकता.

सरकारकडून मिळणारे अनुदान
शेणापासून कागद बनवण्याकरिता तुम्हाला कर्ज आणि अनुदान मिळू शकेल. ५ लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत तुम्ही प्लांट स्थापन करु शकता. शेणखान्यातून कागद तयार करण्याचा प्लांट उभारण्यासाठी १५ लाख रुपये खर्च येऊ शकतो. एका प्लांटमधून महिन्याभरात १ लाख पेपर बॅग तयार करता येतात.

व्हेजिटेबल डायचा व्यवसाय
शेणापासून कागद निर्मितीचाच व्यवसाय आपण करू शकतो असे नाही इतरही व्यवसाय करू शकतो. कागदासोबतच व्हेजिटेबल डाय बनवण्याचा व्यवसायही करु शकता. आपण कागद आणि भाज्यांच्या रंगाचा व्यवसाय सहजपणे करु शकतो. कागदावर प्रक्रियेसाठी शेणापासून फक्त ७ टक्के घटक वापरले जातात. उर्वरित ९३ टक्के घटक भाज्यांचा डाय करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. हे रंग पर्यावरणासाठी अनुकूल आहेत. त्याची निर्यातही केली जाऊ शकते. खादी ग्रामोद्योग विभागाने शेणापासून ‘वैदिक रंग’ बनवला आहे. डिस्टेम्पर आणि इमल्शनमध्ये येणारा हा पेंट इको फ्रेंडली, बिनविषारी, अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल आणि धुता येण्यासारखा असेल, जो अवघ्या चार तासांत कोरडा होईल.

शेणापासून कंपोस्ट खत
सेंद्रिय शेतीला शासनाने प्रोत्साहन दिले आहे. सेंद्रिय शेतीत शेणखताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपण शेणापासून कंपोस्ट खत बनवण्याचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. दीड ते दोन महिन्यात शेणापासून चांगले कंपोस्ट खत बनू शकते.
तसेच जर तुम्ही गायी, म्हशी पाळल्या असतील, तर शेण विकूनही तुम्हाला पैसे मिळवता येतील.