खुशखबर ! ‘या’ व्यवसायासाठी मोदी सरकार देतय तब्बल 4 लाख रूपये, जाणून घ्या सर्वकाही

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही कमी भांडवलात एखादा व्यवसाय करू इच्छित असाल तर हे नक्की वाचा. पापड बनवण्याच्या व्यवसायाला तुम्ही दोन लाखांच्या भांडवलामध्ये देखील सुरु करू शकता. नेशनल स्मॉल इंडस्ट्री कॉरपोरेशनने यासाठी एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे. ज्यानुसार तुम्हाला मुद्रा योजने अंतर्गत चार लाखांपर्यंत कर्ज स्वस्तात मिळू शकते.

या अहवालानुसार सहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये तीस हजार किलोची निर्मिती करता येऊ शकते. यासाठी तुम्हाला ऐकून 6.05 लाख इतका खर्च येऊ शकतो यामध्ये रोज लागणाऱ्या सर्व प्रकारच्या भांडवलाचा समावेश आहे.

फिक्स कॅपिटलमध्ये दोन मशीन, पॅकेजिंग मशीन आणखी लागणारी छोटी मोठी उपकरणे वर्किंग कॅपिटलमध्ये काम करणाऱ्या स्टाफचे तीन महिन्याचे वेतन तीन महिन्यासाठी लागणार कच्चा माला आणि उत्पादन काढायला लागणारा खर्च यांचा समावेष आहे. तसेच यामध्ये उद्योगाच्या ठिकाणचे भाडे, वीज बील, टेलिफोन बील, पाणी अशा गोष्टींचा खर्च देखील सामील आहे.

या मशीनची आवश्यकता
पापड बनवण्यासाठी तुम्हाला स्विफ्टर, दोन मिक्सर, प्लेटफॉर्म बैलेंस, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ओवन, मार्बल टेबल टॉप, पोळपाट लाटणे , एल्युमीनियमची भांडी आणि रॅक्स सारख्या अनेक गोष्टींची आवश्यकता आहे.

250 स्वेअर फूट जागेची गरज
पापड बनवण्याच्या व्यवसायासाठी कमीत कमी 250 स्वेअर फूट जागेचे गरज लागते. जर स्वतःची जागा नसेल तर तुम्ही एवढी जागा भाड्याने घेऊ शकता. तीन साधे कामगार, दोन प्रशिक्षित कामगार आणि एका सुपरवायझरची गरज आहे. या सर्वांच्या पगारावर 25 हजार खर्च येईल जो की हिशोबात धरलेला आहे.

स्वतःचे गुंतवावे लागतील दोन लाख रुपये
सहा लाखांच्या ऐकून भांडवलापैकी दोन लाख रुपये तुम्हाला स्वतः कडचे लावावे लागतील आणि सरकारच्या मुद्रा योजनेनुसार चार लाखांचे कर्ज तुम्हाला मिळेल. ज्यासाठी तुम्ही जवळच्या कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. घेतलेले कर्ज तुम्ही पाच वर्षांपर्यंत भरू शकता.

योग्य पद्धतीने मार्टकेटिंग करा
उत्पादन बनल्यानंतर तुम्हाला त्याला विकावं लागेल यासाठी छोट्या पासून ते मोठ्या रिटेलरला तुम्ही धरून तुमचे उत्पादन विकू शकता.

Visit : Policenama.com