50 हजार गुंतवून करा 6 लाख रुपयांपर्यंत कमाई, सुरू करा ‘ही’ शेती, जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोनाने लोकांचे जीवन बदलले आणि कमाईची पद्धतदेखील बदलली आहे. कोरोनामुळे नोकरी गमावणारे लोक आता बिझनेस किंवा शेतीमध्ये आपले नशीब अजमावत आहेत. जर तुम्ही सुद्धा या फिल्डमध्ये नशीब अजमावणार असाल तर औषधी वनस्पतींची शेती हा चांगला पर्याय आहे. आयुर्वेदाशिवाय आता अ‍ॅलोपॅथीमध्ये सुद्धा काही औषधांची निर्मिती ही वनस्पतींमधून काढलेली केमिकल वापरून होत आहे. याच कारणामुळे यांची मागणी वाढली आहे. आज आम्ही तुम्हाला एक अशा औषधी वनस्पतीबाबत सांगणार आहोत, जिला खुप चांगली मागणी आहे, आणि किंमतही जास्त आहे.

तुम्ही शतावरीची शेती सुरू करू शकता. शतावरीचा उपयोग विविध औषधे बनवण्यासाठी केला जातो. जर इन्कमचा विचार केला तर शतावरीच्या शेतीतून चांगली कमाई सुद्धा होते. दोन वर्षांच्या शेतील तुम्ही केवळ 50 हजार रुपये लावून एक एकर शेतातून 6 लाख रुपयेपर्यंत इन्कम घेऊ शकता.

किती महिन्यात तयार होते शेती
शतावरी ए ग्रेड औषधी वनस्पती आहे. तिची शेती 18 महिन्यात तयार होते. शतावरीच्या मुळापासून औषध तयार होते. यामध्ये 18 महिन्यानंतर ओली मुळे प्राप्त होतात. यानंतर जेव्हा ती सुकवली जातात तेव्हा त्यांचे वजन जवळपास एक तृतीयांश राहते. जर तुम्ही 10 क्विंटल मुळं मिळवलीत तर सुकवल्यानंतर ती केवळ 3 क्विंटल भरतात. पिकाचा दर मुळांच्या गुणवत्तेवर आधारीत असतो.

बाजरातून शतावरीचे बियाणे खरेदी करा आणि नंतर शेतात पेरणी करा. आदेश कुमार यांचे म्हणणे आहे की, एक एकरमध्ये 20 ते 30 क्विंटल उत्पन्न मिळते आणि बाजारात एक क्विंटलची किंमत 50 ते 60 हजार रुपये आहे. शतावरी जर प्लास्टिकल्चर पद्धतीने केली तर पिकाचे नुकसान कमी होऊ शकते. पिकसुद्धा चांगले येते.

किती होईल कमाई
शतावरीचे पिक आयुर्वेदिक औषध कंपन्यांना डायरेक्ट विकता येते. किंवा ते हरिद्वार, कानपुर, लखनऊ, दिल्ली, बनारससारख्या बाजारात विकता येते. जर तुम्ही चांगल्या क्वालिटीची 30 क्विंटल मुळे विकली तर तुम्हाला 7 ते 9 लाख रूपयांची कमाई होईल. जर भाव आणि पिक कमी पकडले तरी सुद्धा 6 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न सहज मिळू शकते.