मोदी सरकारच्या मदतीनं सुरू करा ‘हा’ व्यवसाय, पुढच्या महिन्यात होईल ‘भरघोस’ कमाई, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एप्रिलपासून नवीन शिक्षण सत्र (New Education Session) सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत शाळेशी संबंधित व्यवसाय करण्याची योग्य वेळ आहे. जर तुम्ही कमाईचे स्त्रोत शोधत असाल तर तुम्ही स्कूल बॅग मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करू शकता. जर तुमच्या युनिटचे उत्पादन सुरू झाले तर तुम्ही तीन महिन्यांत चांगली रक्कम मिळवू शकता. या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत सरकार या व्यवसायाला कर्ज देखील देते. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत आपण कर्ज आणि अनुदान देखील घेऊ शकता. या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

इतक्या खर्चात सुरु करता येऊ शकतो हा व्यवसाय
नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने (NSIC) तयार केलेल्या प्रकल्प अहवालानुसार जर तुम्हाला १५००० बॅग बनविणारी युनिट्स बसवायची असेल तर यंत्रसामग्री व उपकरणे, तीन महिन्यांचे कामकाजी भांडवल, कच्चा माल, उपयुक्तता आणि पगारावर सुमारे ११.५५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही या प्रकल्पाच्या अहवालाच्या आधारावर कर्ज घेत असाल तर तुम्हाला भांडवल म्हणून सुमारे १ लाख रुपयांची व्यवस्था करावी लागेल. उर्वरित ९० टक्के कर्ज तुम्हाला मिळू शकेल.

अहवालानुसार, वर्षभरात १५ हजार बॅग बनवणाऱ्या युनिटसाठी तुम्हाला जवळपास १२० चौरस मीटर जागेची गरज भासणार आहे, ज्यामध्ये कमीत कमी १०० चौरस मीटर जागा झाकली जाईल. वीज भार २ किलोवॅट ते ५ किलोवॅटपर्यंत आवश्यक असेल, तर पाण्याचे सामान्य कनेक्शन वर देखील काम होईल.

या यंत्रांची आणि कच्च्या मालाची लागणार आवश्यकता
स्कूल बॅग बनवण्यासाठी तुम्हाला यंत्रसामग्री म्हणून एक सिंगल नीडल फ्लॅट बेड शिलाई मशीन, स्क्रीन प्रिंटिंग इक्वीपमेंट, टूल्स आणि कच्चा माल म्हणून डिझाईन कपडा, नायलॉन स्ट्रॅप, डी-रिंग, झिप, रिवेट्स, कॉटन टेप, बक्कल, लॉक, धागे, एडहेसिव, पॅकिंग मटेरियल इत्यादींची आवश्यकता असेल.

इतकी होणार कमाई
जर स्कूल बॅगची सरासरी किंमत १०० रुपयांपर्यंत ठेवली तर १५ हजार बॅगांची किंमत जवळपास १५ लाख इतकी होईल. आपली गुंतवणूक ११.५५ लाख रुपये इतकी आहे. म्हणजे आपण पहिल्याच वर्षी कमीत कमी ३.५० लाख रुपयांची कमाई करू शकतात, विशेष म्हणजे पुढील वर्षांपासून आपला यंत्रसामग्रीवरील आणि इन्स्टॉलेशनचा खर्च कमी होणार, ज्यामुळे आपल्या कमाईत अजून भर पडेल.