फायद्याची गोष्ट ! फक्त 50 हजार रूपये गुंतवा अन् कमवा दरमहा 30 ते 40 हजार, सुरू करा ‘हा’ व्यवसाय, जाणून घ्या

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे एक उत्तम संधी आहे. यासाठी तुम्ही कमी भांडवलामध्ये टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय सुरु करून महिन्याला हजारो रुपये कमवू शकता. सध्या अशा प्रकारच्या टी -शर्टची बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असून लोकं मोठ्या प्रमाणावर दुसऱ्यांना गिफ्ट देण्यासाठी देखील याचा मोठा वापर होत आहे.

50-70 हजार रुपये सुरुवातीला गुंतवणूक
या व्यवसायाची खास गोष्ट म्हणजे तुम्ही 50-70 हजार रुपयांत हा व्यवसाय सुरु करू शकता. हि गुंतवणूक केल्यास तुम्ही टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसायातून महिन्याला जवळपास 30 से 40 हजार रुपये कमाई करू शकता. त्यानंतर तुमची विक्री वाढल्यानंतर तुम्ही हा व्यवसाय मोठा देखील करू शकता. हळूहळू तुम्ही या व्यवसायाची उलाढाल लाखांपासून ते कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकता.

छोटा व्यवसाय, मोठा फायदा
या व्यवसायासाठी एक प्रिंटिंग मशीन हि साधारणपणे 50 हजार रुपयांना मिळते. त्याचबरोबर यासाठी लागणाऱ्या एका टी-शर्टची किंमत हि साधारणपणे 120 रुपये असते. याच्या प्रिंटींगला खर्च हा शर्टमागे 1 ते 10 रुपये येतो. त्यानंतर तुम्ही हे टी -शर्ट 200 रुपये ते 250 रुपयांपर्यंत विकू शकता. त्यामुळे एका शर्टावर जवळपास तुम्हला 50 टक्क्यांपर्यंत फायदा असून तुम्ही स्वतः याची विक्री करू शकता.

ऑनलाइन विक्री करणे सोपे
आजकाल तरुणाई मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर ऍक्टिव्ह असते. त्यामुळे मार्केटिंगसाठी तुम्ही सोशल मीडियाचा प्रभावी वापर करू शकता. यामुळे खर्च देखील कमी येईल आणि जास्तीतजास्त लोकांपर्यंत तुम्ही उत्पादन पोहोचवू शकाल.

ऑटोमॅटिक मशीनद्वारे दुप्पट उत्पादन
तुमच्या व्यवसायाचा व्याप वाढल्यास तुम्ही यासाठी ऑटोमॅटिक मशीन देखील विकत घेऊ शकता. यामुळे तुमची उत्पादन क्षमता वाढून तुम्ही जास्तीत जास्त टी -शर्ट प्रिंट करू शकता.

Visit : Policenama.com