‘हा’ बिझनेस महिन्याला १ लाख रूपयाची कमई करून देईल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशातील सर्वात मोठा प्रश्न आहे तो रोजगाराचा. परंतू अनेक युवक नोकऱ्यांपेक्षा व्यवसाय करण्याचा विचार सध्या करत आहे, त्यांच्यासाठी व्यवसायाच्या विविध कल्पनांवर जर तुम्ही विचार करत असाल तर बर्ड फार्मिंग (कुकुटपालन) तुमच्यासाठी उत्तम उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय ठरू शकतो. बर्ड फार्मिंग म्हणजेच अंड्यांसाठी कोंबड्यांचे पालन करणे (कुकुटपालन).
जर तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करु इच्छित असाल तर १५०० कोंबड्यांपासून फार्मिंगला सुरुवात करु शकतात. यातून तुम्ही ५० हजार ते १ लाख रुपये महिना कमावू शकतात. परंतू यासाठी सुरुवातीला तुम्हाला ७ ते ९ लाख रुपये भांडवली खर्च येऊ शकतो आणि जर तुम्ही योग्य प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरु करत असाल तर तुम्हाला या गुंतवलेल्या रक्कमेचा एका वर्षात परतावा मिळू शकतो.

५ – ६ लाखाचा खर्च –

पिंजरे आणि इतर सामुग्रीसाठी जवळपास ५ ते ६ लाख रुपये खर्च येऊ शकतो. १५०० कोंबड्या ठेवून काम सुरु करण्याचा विचार केला तर १० टक्के जास्त वस्तू तुम्हाला खरेदी कराव्या लागू शकतात. काही वेळा अचानक कोंबड्यांमध्ये आजाराची लागण झाल्यास कोंबड्या मरण्याची शक्यता वाढू शकते.

कोंबड्या खरेदी करण्याचे बजेट ५० हजार –

कोंबड्या खरेदी करण्यासाठी ५० हजाराचे बजेट तरी हवे. तसेच त्यांना विविध प्रकारचे अन्न पुरवणे. तसेच त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांचे लसीकरण करणे. याचा देखील खर्च असतो.

२० आठवड्यात खर्च होतील ३ ते ४ लाख रुपये –

२० आठवडे कोंबड्यांना अन्न खायला घालण्याचा खर्च असेल जवळपास १ ते १.५ लाख रुपये. पॅरेंट बर्ड एक वर्षात ३०० अंडे देऊ शकतात. २० आठवड्यानंतर कोंबड्या अंडे देण्यास सुरुवात करतात. २० आठवड्यानंतर अन्नाचा खर्च ३ ते ४ लाख रुपये असू शकतो.

वर्षाला १४ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न –

१५०० कोंबड्याचे २९० अंडे असे प्रतिवर्ष सरसरी जवळपास ४,३५,००० अंडे मिळतील. जरी काही करणाने नुकसान झाल्यास ४ लाख अंडे वाचले तरी एक अंडे ३.५ रुपये दराने विकले जाते. म्हणजेच वर्षाला फक्त अंडे विकले तरी १४ लाख रुपयांची कमाई तुम्ही करु शकता. यातून मिळणारे उत्पन्न जरी अधिक असले तरी त्यासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या कामात भ्र्ष्टाचार ,सभापतींचे चौकशीचे आदेश

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

Loading...
You might also like