१ लाखात ‘हा’ व्यवसाय सुरू करून कमवा प्रत्येक महिन्याला १५ हजार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही व्यवसाय सुरु करु इच्छित असाल तर असे अनेक व्यवसाय आहेत ज्यात तुम्ही कमी गुंतवणूकीत व्यवसाय सुरु करु शकता. यातून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. जर तुमची १ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु इच्छितात आणि शहरातच व्यवसाय सुरु करु इच्छितात तर सरकार तुम्हाला मदत करेल. तुम्ही या गुंतवणूकीनंतर महिना १४ हजार रुपयांपर्यंत कमाई करु शकता.
हा व्यवसाय सुरु करु करण्यासाठी सरकार मदत करेल. सरकार तुम्हाला ‘मुद्रा लोन’ देऊन तुम्हाला मदत करेल, सरकारने मुद्रा योजनेत अनेक उद्योगांसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे. यातीलच एका प्रोजेक्ट ज्यात तुम्हाला तुमच्याकडील १ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या योजनेचा फायदा तुम्ही घेऊ शकता.

यात तुम्ही एक व्यवसाय सुरु करु शकतात, प्रोडक्टची ‘मॅन्युफॅक्चरिंग युनिट’. यात कटलरीपासून ते हॅंड टूल आणि शेती कामासाठी लागत असलेल्या उपकरणापर्यंत बनवू शकतात. कटलरीची गरज तर सर्व घरात असतेच. या तुम्हाला फक्त तुमच्या वस्तूची बाजारात चांगली मार्केटिंग करावी लागेल.

मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी खर्च –
सेटअप लावण्यासाठी खर्च – १.८० लाख रुपये
यात मशीनरीसाठी वेल्डिंग सेट, बफिंग मोटर, ड्रिलिंग मशीन, बेंच ग्रिंडर, हॅंड ड्रिलिंग, हॅंड ग्रिंडर, बेंच, पॅनल बोर्ड व इतर उपकरणे.

कच्च्या मालासाठी खर्च
१,२०,००० रुपये ( २ महिन्यासाठी )
कच्च्या मालातून तुम्ही दरमहा ४० हजार कटलरी, २० हजार हॅंडल टूल आणि २० हजार शेतीची उपकरणे तयार करु शकतात.

पगार आणि अन्य खर्च
३० हजार रुपये प्रतिमाह

एकूण खर्च – ३.३ लाख रुपये
यात सुरुवातीला तुम्हाला १.१४ लाख रुपयांपर्यंत खर्च येईल. बाकी खर्चात सरकार तुम्हाला १.२६ लाख रुपयाचे कर्ज देईल आणि ९० हजार रुपयाचे वर्किंग कॅपिटल लोन देईल.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like