1 लाख रूपयांत सुरू करा ‘हा’ खास व्यवसाय, दरमहा 14 ते 15 हजार रूपये कमाई होण्याची ‘गॅरंटी’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका लाखात व्यवसाय सुरु करून महिन्याला खात्रीशीरपणे 14 ते 15 हजार रुपये कमवू शकता. यामध्ये लोखंडापासून बनवता येणाऱ्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. या वस्तू निर्मितीच्या व्यवसायामध्ये तुम्ही घरात लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू तसेच शेतीसाठी लागणारी अवजारे बनवू शकता. ज्यांची सारखी मागणी होत असते.

किती असेल खर्च –
लोखंडापासून छोट्या मोठ्या वस्तू बनवणाऱ्या या मशीनचा सेटअप लावण्यासाठी 1.80 लाख रुपये खर्च येऊ शकतो. यात वेल्डिंग सेट, बफिंग मोटर्स, ड्रिलिंग मशीन, बेंच ग्राइंडर्स, हँड ड्रिलिंग, हँड ग्राइंडर्स, बेंच, पॅनेल बोर्ड आणि इतर साधने यासारख्या यंत्रांचा समावेश असेल. यामध्ये 40 हजार कटलरी (गृह उपयोगी वस्तू ), 20 हजार उपयुक्त साधने आणि 20 हजार कृषी यंत्रे बनवण्यासाठी 1.20 लाख रुपये कच्च्या मालावर खर्च करावे लागतील.

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी प्रत्येक महिन्याला 30 हजार रुपये इतका खर्च येऊ शकतो. 3.30 लाख रुपये खर्च असलेल्या या व्यवसायासाठी तुम्हाला केवळ 1.14 लाख रुपये स्वतःच्या खिशातून टाकावे लागणार आहे. बाकी उर्वरित रक्कम ही सरकारच्या उद्योजक सहायता कर्जातून मिळणार आहे.

यामध्ये 13 % व्याजाच्या कर्जाच्या हिशोबाने प्रत्येक महिन्याला 2,340 रुपये जमा करावे लागतील. इन्सेंटीव्हचा खर्च एक टक्क्याच्या हिशोबाने 1,100 रुपये येणार आहे. या हिशोबाने निव्वळ नफा 1,41,450 रुपये या हिशोबाने प्रत्येक महिन्याला मिळेल.

मुद्रा योजनेनुसार मिळू शकते कर्ज –
या व्यवसायांसाठी लागणाऱ्या कर्ज संबंधात तुम्ही मुद्रा योजने अंतर्गत कर्ज मिळवू शकता. यामध्ये एक फॉर्म भरून त्यात तुमची सविस्तर माहिती तुम्हाला द्यावी लागेल. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फीस द्यावी लागत नाही. आणि कर्जाची रक्कम देखील सुलभ हफ्त्यांनी परत करता येते.

किती मिळेल नफा –
यामध्ये 13 % व्याजाच्या कर्जाच्या हिशोबाने प्रत्येक महिन्याला 2,340 रुपये जमा करावे लागतील. इन्सेंटीव्हचा खर्च एक टक्क्याच्या हिशोबाने 1,100 रुपये येणार आहे. या हिशोबाने नफा 1,41,450 रुपये या हिशोबाने प्रत्येक महिन्याला मिळेल. या व्यवसायात वस्तू निर्मितीसाठी 91 हजार रुपये खर्च येऊ शकतो तर याची विक्री झाल्यानंतर प्रति महिना निव्वळ नफा 18 हजार रुपयांपर्यंत राहू शकतो.

visit : Policenama.com