खुशखबर ! फक्‍त १५ हजारात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, वर्षाला लाखो कमवा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्ही कमी पैशात व्यावसाय करू इच्छिता का. तर तुमच्यासाठी ही बातमी अधिक कामाची आहे. व्यावसायाची खास गोष्ट म्हणजे व्यावसाय सुरु करण्यासाठी सरकार आपल्याला प्रोजेक्ट कॉस्टचे ९० टक्के कर्ज देणार आहे. हा असा व्यावसाय आहे ज्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हा व्यावसाय आहे तो सॅनेटरी नॅपकीनचा. हा व्यावसाय सुरु करताना तुम्हाला फक्त १५ हजार रुपयांची गुंतवणुक करावी लागणार आहे. याच्या पहिल्या वर्षात १.१० लाख रुपयांपर्यंत कमवू शकता. तर दुसऱ्या वर्षात याचा फायदा डबल होऊ शकतो.

हा व्यावसाय तुम्ही अगदी छोट्या खोलीमध्येही सुरु करू शकता. सरकाच्या मुद्रा योजनेअंतर्गत व्यावसायात सॅनेटरी नॅपकीनच्या व्यावसायाचा समावेश करण्यात आला आहे. प्रोजेक्टच्या रिपोर्टनुसार दिवसभरात एका युनीटमध्ये तुम्ही १४४० नॅपकिन बनवू शकता. आठ नॅपकिन एका पाकिटात असल्यास एकूण १८० पॅकेटचे प्रोडक्शन करता येऊ शकते.

रिपोर्टनुसार जर तुम्हाला हा व्यावसाय करायचा असल्यास फक्त १६X१६ फुट च्या खोलीत तुम्ही हे युनिट लावू शकता. सुरुवातीला या प्रकल्पात तुम्हाला १५ हजार रुपयांची गुंतवणुक करावी लागेल. प्रकल्पातील रिपोर्टनुसार जर तुम्ही दिवसभरात १८० पॅकेट बनवण्याचे युनीट लावायचे असेल तर त्यात तुम्हाला एकूण खर्च १.४५ लाख रुपये लागणार आहेत. त्यातील ९० टक्के रक्कम म्हणजे १.३० लाख मुद्रा योजने अंतर्गत सरकारकडून देण्यात येते. त्यामुळे तुम्हाला यात फक्त १५ हजार रुपयांची गुंतवणुक करावी लागणार आहे.

या प्रकल्पात तुम्हाला डिफाइबरेशन मशीन, कोर मॉर्निंग मशीन, सॉफ्ट टच सीलिंग मशीन, नॅपकिन कोर डाय, यूवी ट्रीट युनिट या मशीनस घ्याव्या लागतील. त्यासाठी आपल्याला ७० हजार रुपयांचा खर्च येतो. तसंच वुड पल्प, टॉप लेअर, बॅक लेअर, रिलीज पेपर, गम, पॅकिंग कवर हे कच्च्यामालाच्या स्वरूपात घ्यावे लागतात. रिपोर्टनुसार एका महिन्याला कच्च्या मालासाठी ३६ हजार रुपये खर्च येतो.

जर वर्षभरात ३०० दिवस काम केले तर ५४००० पॅकेटचे प्रोडक्शन होते. त्याची किंमत ४.३२ लाख रुपये होते. पगारावर ८४ हजार, प्रशासनिक खर्च २७ हजार, डेप्रिशिएशनचे ८ हजार, इंशॉरंसचे ८०० रुपये, रिपेअर मेंटनंस ४ हजार रुपये, इंटरेस्ट ऑन कॅपिटलवर १८ हजार, सेलिंग खर्च १६२०० रुपये म्हणजे एकूण खर्च ५.९० लाख रुपये होतात.

दरम्यान, या प्रकल्पाच्या अहवालात कमाई संदर्भात अनुमान लावण्यात आले आहे. जर तुम्ही हे नॅपकिनचे पॅकिट १३ रुपये किंमतीत विकले तर आपल्याला ७.०२ लाख रुपये मिळतात. त्यातील खर्च काढलात तर आपल्याला १.०८ लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. त्यातल्या त्यात मशीनवर होणारा खर्च वजा केला तर आपल्याला होणारा फायदा अधिक वाढतो.

 गोरी त्वचा हवी असेल तर करा हे घरगुती उपाय

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

हृदयाच्या रक्तवाहिनी च्या आजारामुळे होतात छातीत वेदना

आरोग्यदायी जीवनासाठी नियमित दूध घ्यायलाच हवे

चांगल्या आरोग्यासाठी जीम मध्ये जाण्यास वेळ नसेल तर ‘हे’ करा

सावधान ! समुद्रात आंघोळ करणार असाल तर हे तुमच्यासाठीच आहे, जरूर वाचा