पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र सुरूच, जाणून घ्या राज्यातील आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लागोपाठ दरवाढ सुरू आहे. पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोलचे दर 25 पैशांनी आणि डिझेलचे दर 21 पैशांनी वाढले आहेत. दिल्लीत तर पेट्रोलपेक्षा डिझेल महाग अशी विचित्र स्थिती झाली आहे. दिल्लीत पेट्रोल 80.38 रुपये तर डिझेल 80.40 रुपए प्रति लीटरने विकले जात आहे.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई           87.14 – 78.71
पुणे             86.57 – 77.00
ठाणे            86.50 – 76.90
अहमदनगर  86.49 – 76.97
औरंगाबाद    87.46 – 77.83
धुळे             87.30 – 77.69
कोल्हापूर     87.79 – 78.21
नाशिक        87.30 – 77.71
रायगड         86.99 – 77.37

ही इतिहासातील पहिली वेळ आहे की, डिझेल, पेट्रोलेपेक्षा महाग झाले आहे. तेल मार्केटिंग कंपन्यांनी मागील 21 दिवसांपासून मनमानी पद्धतीची संतापजनक अशी दरवाढ सुरू ठेवली आहे. बुधवारी झालेल्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल महाग ही स्थिती झाली आहे. मागील 15 दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती 35-40 डॉलर प्रति बॅरलच्या दरम्यान आहेत, तर दुसरीकडे देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात लागोपाठ वाढ होत आहे.

जाणून घ्या किती आहे उत्पादन शुक्ल व अन्य कर
पेट्रोलच्या मुळ किमतीत कर 50.69 रुपये प्रति लीटर म्हणजेच 64 टक्के आहे. यामध्ये 32.98 रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क आणि 17.71 रुपये स्थानिक विक्रीकर किंवा वॅट आहे. तर डिझेलच्या मुळ किमतीत कर सुमारे 63 टक्के म्हणजेच प्रति लीटर 49.43 रुपये आहे. यामध्ये 31.83 रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क आणि 17.60 रुपये वॅट आहे.