प्रत्येक गोष्टींमध्ये तसेच कामांमध्ये यशस्वी व्हायचं तर मग ‘या’ 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जर तुमची कामं यशस्वी होत नसतील तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यावर तुम्ही लक्ष द्यायला हवं. असं म्हणतात की, अडथळ्यांशिवाय यश नाही. परंतु काही बाबींवर तुम्ही लक्ष दिलं तर अडचणी कमी होतील आणि तुम्ही तुमची कामं यशस्वीपणे पार पाडू शकतात. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

1) कोणतेही काम कराताना त्याच्या परिणामांचा विचार करा. कामाचा आराखडा तयार करा. त्या विशिष्ट कामासाठी अनेक पर्याय कसे उपलब्ध करता येतील याचाही विचार करा.

2) जे काम करायचं आहे त्याचं योग्य आकलन करा. जास्त करून सकारात्मक आकलन करण्याचा प्रयत्न करा. याचा पुढे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

3) जर एखादं काम कठिण असेल तर त्याची छोट्या छोट्या भागात विभागणी करा. त्यातील एकेका भागाचा काळजीपूर्वक अभ्यास करा. यासाठी तुम्ही इतरांचा सल्लाही घेऊ शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे सल्ला जरी इतरांचा असला तरी निर्णय मात्र तुमचा असू द्या. कारण निर्णय चुकला किंवा बरोबर आला तरी याची जबाबदारी सर्वस्वी आपली असते.

4) जे काम जास्त महत्त्वाचं आहे त्यावर आधी लक्ष द्या. एकाच वेळी अनेक कामांवर लक्ष देण्यापेक्षा एकावेळी एकाच कामावर लक्ष द्या. एक काम आधी पूर्ण करा.

5) आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर या आणि आव्हानांना भिडा. याने तुमच्या आयुष्याला वेग येतो. जी गोष्ट करायची आहे त्याच्या परिणामांना सामोरं जाण्याची तयारीही ठेवा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/