Credit Card च्या थकबाकीपासून सुटका हवीय, तर ‘या’ 5 स्मार्ट टिप्सचं करा पालन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली गेली, ज्या नंतर अनेक लोकांच्या नोकर्‍या गेल्या, तर अनेकांच्या पगारात कपात केली गेली. यामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. आर्थिक संकटाच्या दरम्यान आपले खर्च पूर्ण करण्यासाठी काही लोकांनी मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्डचा वापर केला आहे. ज्या लोकांनी क्रेडिट कार्डचा वापर केला आहे ते मोठ्या कर्ज संकटात फसले आहेत. जर तुम्ही सुद्धा लॉकडाऊनच्या दरम्यान क्रेडिट कार्डच्या कर्जात फसले असाल तर यातून सुटका करून घेण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेवूयात.

बॅलन्स ट्रान्सफर सुविधेचा पर्याय
या सुविधेचा उपयोग करून तुम्ही कमी दरात एक कार्डातून दुसर्‍या कार्डवर थकबाकी ट्रान्सफर करू शकता. तुम्हाला हे कर्ज चुकवण्यासाठी 6 महिन्यापर्यंचा कालावधी मिळेल.

क्रेडिट कार्डला ईएमआयमध्ये बदला
काही क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्हाला कार्डवर थकबाकीची रक्कम मासिक हप्त्यांमध्ये एकसमान दरावर बलण्याची परवानगी देतात, जो त्या दरापेक्षा खुप कमी असतो जो देय तारखेला चुकल्यानंतर भरणा केला जाईल. तुमची बँक देय रक्कम ईएमआयमध्ये बदलण्यासाठी 1-2% च्या दरम्यान प्रोसेसिंग शुल्क घेईल.

सर्वात जास्त व्याजदराचे कर्ज प्रथम भरा
जर क्रेडिट कार्डवर जास्त कर्ज आहे तर सर्वप्रथम जास्त व्याजवाले कर्ज भरा. जर तुमच्या एका कार्डमध्ये जास्त पैसे आहेत तर प्रथम त्याद्वारे दुसर्‍या कार्डचे पैसे भरा.

तुमच्या सर्व कार्डांच्या एकुण देय रक्कमेचा हिशेब करा आणि संपूर्ण क्रेडिट कार्डच्या देय रक्कमेसाठी पर्सनल लोनसाठी विविध बँकांशी चर्चा करा. अशा बँकेचे कर्ज घ्या, जी तुम्हाला सर्वात कमी व्याजाने कर्ज देईल आणि एकाच वेळी सर्व क्रेडिट कार्डचे लोन चुकते करा. आपल्या परतफेड करण्याच्या क्षमतेनुसार पर्सनल लोन टेन्युर निवडा.