प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर हे कार चालकाकडे सुसाईड नोट ठेवून बेपत्ता

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर (वय 64) कार चालकाकडे सुसाईड नोट ठेवून बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सायंकाळी ते मॉडेल कॉलनी येथून बेपत्ता झाले आहेत.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आटोमोबाईल क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या पाषाणकर ग्रुपचे गौतम पाषाणकर हे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते बांधकाम व्यवसायिक देखील आहेत. दरम्यान त्यांना व्यवसायात आर्थिक नुकसान झाले असल्याचे यावरून दिसून आले आहे. गौतम पाषाणकर यांनी बुधवारी सायंकाळी त्यांच्या कार चालकाला एक लिफाफा दिला. तसेच तो घरी देण्यास सांगितले आणि त्या कार चालकाला तुझे काही काम असेल तर करून ये असे सांगत मी पाई घरी येतो असे म्हणून निघाले. चालकाने तो लिफाफा घरी दिला. तो उघडून पहिला असता त्यात मी आत्महत्या करत असून, व्यवसायात मोठे नुकसान झाले आहे, असे म्हंटले असल्याचे शिवाजीनगर पोलिसांकडून सांगण्यात आले. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

You might also like