व्यापाऱ्याचे अपहरण करुन २० कोटींची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

टिंबर मार्केटमधून शनिवारी सायंकाळी एका व्यापाऱ्याचे अपहरण करुन २० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने रविवारी पहाटे अटक केली. व्यापाऱ्याची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या आणखी दोन साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a5b9833a-c9fc-11e8-b553-d757bab38fab’]

सुरज लक्ष्मण चव्हाण (वय २५, रा़ कुंभारगाव, मु़ चव्हाणवाडी, सातारा, सध्या वडकीनाला, हडपसर), आरबाज फिरोज खान (वय २७, रा़ चुडामण तालीम, भवानी पेठ), फरदीन परवेज खान (वय १९, रा़ मिठानगर, कोंढवा) आणि साहील अब्दुल शेख (वय२३, रा़ मिठानगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहाबाज फिरोज खान (वय २८, रा़ चुडामण तालीम, भवानी पेठ)  आणि सुयश वाघमारे (वय २७, रा़ भवानी पेठ) हे दोघे फरार आहेत.  याबाबतची माहिती अशी, टिंबर मार्केटमधील एका व्यापाऱ्याचे शनिवारी सायंकाळी मोटारीतून अपहरण करण्यात आले. त्या बाबतची माहिती पोलिसांनी सायंकाळी साडेसहा वाजता समजली़. सुरुवातीला २० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या या गुन्हेगारांनी त्यानंतर आपली मागणी कमी कमी करत १५ लाखांवर आणली. गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीश सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची सर्व पथके संपूर्ण पुणे शहरात त्यांचा शोध घेत होते. त्याच दरम्यान मध्यरात्रीनंतर आरोपी हे कात्रज परिसरात असल्याचे समजले.

[amazon_link asins=’B07B9SRMRC,B01NAIDKSQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e662f0ea-c9fe-11e8-a623-1bea410f4afe’]

पोलिसांनी गुन्हेगारांनी ज्या गाडीतून व्यापाऱ्याला पळवून नेले होते ती गाडी शोधून काढली. आरोपी हे व्यापाऱ्याला खेड शिवापूरकडे घेऊन जात होते. चालत्या गाडीला ओव्हरटेक करुन पोलिसांनी चारही बाजूने ती गाडी घेरुन तिला थांबायला भाग पाडले. पोलिसांनी गाडी मध्ये असलेल्या व्यापाऱ्याची आधी सुटका केली. त्यानंतर गाडीतील तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गावठी कट्टे आणि कोयते आढळून आले आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील, उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम, पोलीस कर्मचारी सचिन जाधव, इम्रान शेख आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तिघांना पकडून खडक पोलिसांच्या ताब्यात दिले. अटक आरोपींच्या आणखी दोन साथीदारांचा शोध सुरु आहे. गुन्हयाचा पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.

पतीकडूनच अश्लिल फोटो, व्हिडिओ पाठवून होतेय अनैतिक संबंधाची चौकशी

You might also like