गुजरात : विवाहबाह्य संबधातून व्यापा-याची हत्या, मृतदेहाचे तुकडे सुटकेसमध्ये भरून दिले फेकून

पोलीसनामा ऑनलाईन – विवाहबाह्य संबंधातून प्रेयसीने आपली आई आणि होणा-या नव-या सोबत मिळून एका 46 वर्षीय व्यापा-याची हत्या केली. एवढेच नव्हे तर या तिघांनी व्यापा-याच्या मृतदेहाचे तुकडे करुन सुटकेसमध्ये भरून राजधानी गाडीतून गुजरातच्या भरुचमध्ये फेकून दिले. आदर्शनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

नीरज गुप्ता असे मृत व्यापा-याचे नाव आहे. या प्रकरणी प्रेयसी फैसल (29), प्रेयसीची आई शाहीन नाझ (45) आणि होणारा नवरा जुबेर (28) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्याच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली वीट आणि चाकू हस्तगत केले आहेत. तर मृतदेहाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक गुजरातला रवाना झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 13) ही घटना घडली आहे मृत नीरज गुप्ता हा मॉडल टाऊन येथे राहत होता. त्याचा करोल बागमध्ये बिजिनेस होता. त्याचे ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. नीरज यांच्या पत्नीने 14 नोव्हेंबरला बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. नीरजच्या बेपत्ता असण्यामागे फैजल नावाच्या प्रेयसीचा हात असल्याची शंकाही तिने व्यक्त केली होती. फैजल ही नीरजच्या ऑफिमध्ये काम करायची आणि तिच्यासोबत नीरजचे अवैध संबंध होते.

पोलिसांनी जेव्हा फैजलची चौकशी केली त्यावेळी तिने नकार दिला. मात्र, तिच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्स आणि लोकेशनवरुन पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच फैजलने पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला. फैजल आणि नीरजमध्ये यांच्यात गेल्या 10 वर्षांपासून विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. मात्र, फैजलच्या घरच्यांनी तिचे दुसऱ्या मुलाशी लग्न ठरवले होते. जुबेर नावाच्या मुलाशी तिचा साखरपुडाही झाला. जुबेर हा राजधानी ट्रेनच्या पँट्रीमध्ये काम करतो. फैजलने दिलेल्या दग्यामुळे नीरज नाराज होता. नीरज याने 13 नोव्हेंबरला रागाच्या भरात फैजलच्या घरी जावून तिला मारहाण केली. त्यावेळी तिची आई आणि जुबेर तिथेच होता. या तिघांनी मिळून नीरजच्या डोक्यात वीट घातली आणि पोटात तीनवेळा चाकू भोसकून हत्या केली. एवढ्यावरच न थांबता हत्या केल्यानंतर फैजलने जुबेरच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे करून ते सुटकेसमध्ये भरले. जुबेरने ते निजामुद्दीन स्टेशनला घेऊन गेले. त्या स्थानकावरून गोव्याला जाणा-या राजधानी एक्सप्रेसमधील ट्रेनच्या पॅट्रीमध्ये ठेवून मृतदेह प्रवासात लागलेल्या गुजरातच्या भरूचमध्ये फेकून दिला.