Boss असावा तर असा ! कर्मचार्‍यांना दिले कंपनीचे शेअर, सर्व बनले कोट्यधीश !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  ब्रिटनच्या एका उद्योगपतीने आपल्या कंपनीचे प्रॉफिट शेअर्स आपल्याच कंपनीच्या कर्मचार्‍यांना वाटले आहेत. आता त्यांच्या कंपनीचे बहुतांश कर्मचारी कोट्यधीश बनले आहेत. उद्योगपतीने हे तेव्हा केले जेव्हा कंपनीचा शेअर वेगाने वर गेला आणि कंपनीला खूप मोठा प्रॉफिट झाला.

या कंपनीचे नाव आहे द हट ग्रुप, तर मालकाचे नाव आहे मॅथ्यू मोल्डिंग (Charing). मॅथ्यू यांनी आपल्या कंपनीच्या प्रॉफिटमधील 830 मिलियन पाउंड म्हणजे सुमारे 8183 कोटी रुपयांचे शेअर आपल्या कंपनीच्या कर्मचार्‍यांमध्ये वाटले. त्यांनी एक बाय बॅक स्कीम चालवली. ही सर्व कर्मचार्‍यांसाठी ओपन स्कीम होती.

या स्कीमचा फायदा त्या कर्मचार्‍यांना मिळाला, ज्यांनी कधी विचारही केला नव्हता. कर्मचार्‍यांची निवड त्यांच्या मॅनेजरने केली आणि लिस्ट मॅथ्यूपर्यंत पोहाेचली. या स्कीमचा फायदा कंपनीच्या ड्रायव्हर्सपासून मॅथ्यू यांच्या पर्सनल असिस्टंटपर्यंत सर्वांना झाला. मॅथ्यू यांची पर्सनल असिस्टंट म्हणते की, तिला इतके पैसे मिळाले आहे की, ती 36 वर्षांच्या वयात रिटायरमेंट घेऊ शकते.

ब्रिटिश वृत्तपत्र मिररशी बोलताना मॅथ्यू मोल्डिंग यांनी म्हटले की, मी सर्वांना माझा आणि कंपनीचा नफा वाटला आहे. यासाठी ही स्कीम ठेवली. सर्वांना खूप पैसे मिळाले आहेत. यावेळी व्यापाराच्या विरोधात खूप लोक बोलत होते, परंतु मला विश्वास होता की, शेअर वर जातील. कुणीही परफेक्ट नसतात, परंतु आपल्याला लाभ आणि पैशात भाग जरूर हवा असतो.

द हट ग्रुप एक ई-कॉमर्स बिझनेस आहे. मॅथ्यू मोल्डिंग जिमिंगचे शौकीन आहेत. ते खूप फिट राहतात. लॅम्बोर्गिन चालवतात. विेशेषता आपल्या प्रोटीन सेक्स आणि आपल्या ब्रँड्सच्या ब्यूटी प्राॅडक्ट्ससाठी ओळखले जातात. मॅथ्यू यांना अनेक बिझनेस अवॉर्ड मिळाली आहेत. जगभरात अनेक दिग्गज नेत्यांशी त्यांची ओळख आहे. मॅथ्यू आपल्या शानदार पार्ट्यांसाठीसुद्धा ओळखले जातात.

द हट ग्रुप जगभरात 164 देशांमध्ये काम करत आहे. या वर्षी सप्टेंबरमध्येच मॅथ्यू मोल्डिंग यांना फोर्ब्सने अरबपतींच्या यादीत पहिल्यांदा स्थान दिले आहे. शेअर स्कीममुळे कंपनीच्या सुमारे 200 कर्मचार्‍यांना थेट लाभ झाला आहे. ते करोडपती झाले आहेत.