दीड वर्षापुर्वी केलं होतं ‘दुसरं’ लग्न, एक ‘कॉल’ अन् काही तासात फॅमिलीचा ‘दि एन्ड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीजवळच गाजियाबादच्या इंदिरापुरममध्ये मंगळवारी एक मन हेलावून टाकणाऱ्या घटनेचा खुलासा झाला. ज्या व्यवसायिकाने आपल्या दोन मुलांची हत्या करुन आपल्या पत्नीसह आणि एका दुसऱ्या महिलेसह इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारली, ती दुसरी महिला व्यवसायिकाची दुसरी पत्नी होती.

डेढ़ साल पहले की थी दूसरी शादी, एक कॉल और कुछ घंटों में फैम‍िली खत्म

गुलशन वासुदेव (वय – 45 वर्ष) बरोबर राहणाऱ्या एका दुसऱ्या महिलेच्या नात्याचा खुलासा झाला. गुलशनच्या मॅनेजर संजनाबद्दल त्याच्या भावाने फिरोजने पोलिसांना सांगितले की दीड वर्षांपूर्व संजनाने गुलशनबरोबर विवाह केला होता. यामुळे ती कुटूंबाबरोबरच राहत होती. गुलशन वासुदेव यांच्या कुटूंबातील कोणालाही याची माहिती नव्हती. संजना मुस्लिम समाजातील होती. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम 302 आणि 306 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

इंदिरापुरमच्या वैभव खंडमध्ये पती, पत्नी आणि एक महिला तसेच दोन लहान मुलं यांच्या हत्येचे प्रकरणं समोर आले. आरोपी राकेश वर्माचे निकटवर्तीय होते. राकेश वर्माच्या कुटूंबांची चौकशी करताना महत्वपूर्ण माहिती समोर आली होती. सामूहिक आत्महत्या प्रकरणी आरोपी राकेश वर्माला पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. गाजियाबादच्या मोहन नगर भागात त्याला ताब्यात घेण्यात आले.

डेढ़ साल पहले की थी दूसरी शादी, एक कॉल और कुछ घंटों में फैम‍िली खत्म

वैभव खंड स्थित कृष्णा सफायर सोसायटीच्या 8 व्या इमारतीत 806 नंबरचा प्लॅट आहे. या प्लॅटच्या बालकनीतून पती पत्नी आणि एक इतर महिलेने मंगळवारी सकाळी पाच वाजता आत्महत्या केली. जेव्हा पोलिसांनी फ्लॅटचा तपास केला तेव्हा घराच्या आत एक 13 वर्षांच्या मुलाचा (ऋतिक) आणि 17 वर्षाची मुलगी कृतिका मृतावस्थेत पडली होती. गुलशनचा मुलगा ऋतिक दिल्लीच्या श्रेष्ठ विहारात डीएवी शाळेत नववीला होता तर मुलगी कृतिका बारावीनंतर फॅशन डिझाइनचा कोर्स करत होती.

घरात त्यांनी एक ससा पाळला होता. हा ससा देखील मृतावस्थेत होता आणि खोलीत एक सुसाइड नोट मिळाली. यानुसार आर्थिक मंदी आणि काही लोकांकडे मोठ्या रक्कमेची थकबाकी असल्याची माहिती आहे. यात त्याचे साडू राकेश वर्माला सुसाइड नोटमध्ये मृत्यूला जबाबदार धरण्यात आले आहे.

डेढ़ साल पहले की थी दूसरी शादी, एक कॉल और कुछ घंटों में फैम‍िली खत्म

असे मानले जाते की, गुलशनने पहिल्यांदा घरातील पाळलेला ससा मारला. त्यानंतर दोन्ही मुलांचा गळा दाबून हत्या केली. संजना कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होती आणि आदल्या रात्री जवळपास 9 वाजता त्यांच्या घरी पोहचली. मुलाच्या मृत्यूनंतर पती, पत्नी आणि दुसऱ्या महिलेबरोबर इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारली. गुलशच्या कंपनीत काम करणाऱ्या संजनाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. संजना गुलशनच्या कंपनीत मागील 5 वर्षांपासून मॅनेजर म्हणून काम करत होती आणि दीड वर्षापूर्वीच दोघांचे लग्न झाले होते.

घरातील भिंतीवर काही नोटा चिटकवण्यात आल्या होत्या आणि आत्महत्या केलेल्या सर्व लोकांचा अंतिम संस्कार याच पैशातून व्हावा. राकेश वर्माच्या कुटूंबाला मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले.

डेढ़ साल पहले की थी दूसरी शादी, एक कॉल और कुछ घंटों में फैम‍िली खत्म

पोलिसांच्या तपासात आढळले की, राकेश वर्मावर गुलशन वासूदेवचे जवळपास 2 कोटी रुपयांची थकबाकी होती. गुलशनची जीन्सची फॅक्ट्री होती ज्यात त्याला नुकसान झाले होते. त्यामुळे तो आर्थिक मंदीत होता. तसेच मोठ्या प्रमाणात रक्कम त्यांच्या नातेवाईकांकडे अडकली होती आणि राकेशचे दिलेले चेक बाऊंस झाले होते आणि रक्कम त्याला परत मिळत नव्हती. गुलशनने दिल्लीच्या झिलमिल कॉलोनीतील आपली वडिलोपार्जित संपत्ती विकली होती, त्यातील एक मोठी रक्कम त्यांनी आपला नातेवाईक राकेश वर्माला दिली होती.

या पैशांसाठी सोमवारी गुलशनने राकेश वर्माला फोन लावला होता परंतू काम झाले नाही. तेव्हा रात्रीच झोपेत असलेल्या आपल्या दोन्ही मुलांची त्यांनी हत्या केली त्यानंतर आपल्या एका मित्राला पहाटे 3.30 वाजता व्हिडिओ कॉल करुन सांगितले की सर्व काही संपले आहे. त्यानंतर सकाळी 5 वाजता गुलशनने आपल्या दोन्ही पत्नीसह इमारतीच्या 8 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.

डेढ़ साल पहले की थी दूसरी शादी, एक कॉल और कुछ घंटों में फैम‍िली खत्म

राकेश वर्मा साहिबाबादच्या शालीमार गार्डन कॉलोनीत राहतो, पोलिसांच्या मते राकेश वर्मा एक बिल्डर आहे. त्याचा गुलशन वासुदेव बरोबर 2 कोटी रुपयांचा वाद चालू आहे. संपत्ती विक्रीतून आलेले पैसे त्याने साडू राकेश वर्माबरोबर एका दुसऱ्या ठिकाणी गुंतवले होते. आरोप आहे की साडू पैसे परत देण्यास नकार देत होता. त्यामुळे गुलशनने साडू राकेश वर्मा व त्यांच्या आईवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी कारवाई करत साडू राकेश वर्मा व त्यांच्या आईला फसवणूकीप्रकरणी तुरुंगात धाडले आहे.
तक्रार दिल्यानंतर रुपये परत करण्याची शक्यता जवळपास संपली होती. दुसरीकडे देणेदारी वाढत होती. एसएसपीने शक्यता वर्तवली की या देणेदारीमुळे व्यवसायिकांनी कुटूंबासह आत्महत्या केली. या सामूहिक आत्महत्या प्रकरणी बुधवारी पोलिसांनी राकेश वर्मांना ताब्यात घेतले.

Visit : policenama.com