सावकारी कर्जाला वैतागून व्यावसायिकाची आत्महत्या 

कोल्हापूर: पोलिसनामा ऑनलाईन

येथील तेलाचा उद्योग करणाऱ्या एका व्यापाऱ्याने सावकाराचे वाढलेले कर्ज द्यायला पैसे नसल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवारी) सकाळी घडली आहे . याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

उमेश रामेश्वर बजाज (वय ४७ रा. माळी कॉलनी, टाकाळा) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
[amazon_link asins=’B014PHNRE4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e0dedfab-973a-11e8-95e1-c3722dda9ac3′]

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाकाळा येथे राहणारे उमेश बजाज व त्यांच्या भावाने सांगलीतील माधवनगर भागात खाद्य तेलाचा उद्योग सुरू केला होता. या व्यवसायासाठी त्यांनी सांगलीतील काही खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते .व्‍यवसायात मंदी आल्यामुळे सावकाराचे पैसे परत करणे शक्य झाले नाही. त्यामुळे खासगी सावकारांनी मागील सहा महिन्यांपासून मुद्दल व व्याजाची रक्कम मागणीसाठी तगादा लावला होता.सध्या पैसे नसून पैशाची व्यवस्था करून पैसे परत करू असे बजाज यांनी सांगितले होते. पैशाची व्यवस्था होत नसल्याने तणावात असलेल्या बजाज यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.