काय सांगता ! होय, ट्विटरवर ‘फॉलो’ करणार्‍यांना ‘हा’ उद्योगपती देणार कोट्यावधी रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जपानी अब्जाधीश युसाकू मीजावा ट्विटरवर त्याला फॉलो करणाऱ्या काही लोकांना कोट्यावधी रुपये देणार आहेत. त्यांनी रविवारी सांगितले की, ज्या फॉलोवर्संनी १ जानेवारी रोजी त्यांनी केलेले ट्विट पुन्हा री -ट्विट केले, त्यातील १००० लोकांना ते १० लाख येन म्हणजेच सुमारे साडेसहा लाख रुपये देणार आहेत. त्याने सांगितले कि, हे एका ‘सीरियस सोशल एक्सपेरिमेंट’ अंतर्गत केले जाणार आहे, जेणेकरून पैशाने लोकांच्या आनंदात वाढ होते की नाही, हे शोधले जाईल.

ते याला मूलभूत उत्पन्नाच्या कल्पनेशी जोडण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, जपानी ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ तोषीहीरो नागाहामा यांचा विचार वेगळा आहे. ते सांगतात कि, “मूलभूत उत्पन्नाचा अर्थ म्हणजे नियमितपणे आपल्याला मिळणारी किमान रक्कम, जी सुरक्षिततेची भावना देते, परंतु मेजावा जी पैसे देत आहे ते पूर्णपणे वेगळे आहे.” मिझावा म्हणाले की, पैसे प्राप्तकर्त्यांचा सर्व्हे घेत या प्रयोगाच्या निकालाचा मागोवा घेतील.

दरम्यान, हि काही पहिली वेळ नाही , मागील वर्षी २०१९ मध्येही मिजावा यांनी आपल्या १०० फॉलोवर्सना १० कोटी देण्याची घोषणा केली होती. ही ऑफर त्यांनी आपल्या ऑनलाईन फॅशन बिझनेस Zozo Inc सॉफ्ट बँकेला ९० करोड डॉलरला विकला होता तेव्हा केली होती.

अंतराळात जाणारे मिजावा बनणार पहिले खाजगी यात्री
युकासू मिजावा हे जगातील पहिले व्यक्ती असतील जे वैयक्तिक स्तरावर अ‍ॅलन मस्कच्या स्पेस-एक्स विमानात बसून अंतराळात जाऊन चंद्राला फेरी मारणार आहेत. त्यांना स्पोर्ट्स कार आणि पेंटिंगची विशेष आवड आहे. मिजावा यांचे ६५ लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. त्यांची वैयक्तिक संपत्ती जवळपास २ अब्ज डॉलर इतकी आहे. त्यांनी सांगितले कि, माझ्याजवळ पैशांसाठी आणि पैसे वाटण्यासाठी रिकामा वेळ आहे. तसेच मी मान्य करतो कि, बेसिक इनकमची कन्सेप्ट कोणत्याही कामाशिवाय, नागरिकांना निश्चित रकमेसाठी दिली जावी. म्हणूनच मी या प्रयोगाला बेसिक इनकमची काॅन्सेप्टशी जोडून बघतो आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/