‘त्या’ इंटरनॅशनल हॉटेलमध्ये ‘डान्स ग्रुप’च्या नावाखाली ‘सेक्स’ रॅकेट चालायचं, पोलिसांकडून ‘पर्दाफाश’, 5 युवतींची सुटका

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका मोठ्या हॉटेलच्या रुमध्ये डान्स ग्रुपच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर ५ पीडित तरुणींची सुटका केली आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेहनवाज रेहमान खान (वय-४० रा. मालाड), साजिद इकबाल खान (वय- ३९ रा. जोगेश्वरी) या दोन एजंटला अटक केली आहे तर हॉटेलमध्ये रूम बुक करणारा दीपक वाल्मिकी (वय-३० रा. पवई) यालाही अटक करण्यात आली आहे. या कारवाईत मुंबई, मिराभाईंदर येथे राहणाऱ्या २५ ते ३० वयोगटातील तरुणींची सुटका केली.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा येथील रुद्रा इंटरनॅशनल शेल्टर हॉटेलमध्ये डान्स ग्रुपच्या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी ४ डमी ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. डमी ग्राहकांनी इशारा करताच सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी हॉटेलमध्ये बुधवारी रात्री छापा टाकला.

आरोपी एजंट शेहनवाज खाने आणि साजिद खान हे डान्स ग्रुपचे आयोजन करून ग्राहकांना बोलावून घेत होते. तर दीपक वाल्मिकी याने हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. या रुममध्ये डान्ससाठी डीजे, साऊंड सिस्टिम, लाईट सिस्टीम, कॉम्प्युटरची सुविधा दीपक वाल्मिकीने केली होती. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिद्धवा जयभाये आणि वसई युनिटच्या कर्मचाऱ्यांनी केली.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like