..तर राष्ट्रवादीवाले देशद्रोही : डॉ. सुजय विखे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपमध्ये दाखल झालेले डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. माझी बांधिलकी काँग्रेसशी आहे, राष्ट्रवादीशी नाही. अजून अनेक गोष्टी घडायच्या आहेत. असा इशाराही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर नगरमध्ये आलेल्या डॉ. विखे यांनी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या घरी त्यांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे विधान केले.

राष्ट्रवादीवर टीका करताना सुजय विखे म्हणाले की , ‘मी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांच्या इंस्टाग्रामवर माझा भाजपात प्रवेश करणार नाही, असे म्हणत असल्याचा व्हिडीओ टाकला. मी तुमच्या पक्षाचा नाही. माझी बांधिलकी काँग्रेसशी आहे, राष्ट्रवादीशी नाही. अजून बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत. पवार साहेबांनी माझ्या दिवंगत आजोबांवर टीका करायला नको होती. यातून पवारांच्या मनात विखे परिवाराविषयी काय मत आहे हे दिसून येते. पवार म्हणतात, १९९१ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार म्हणून. १९९१ सारखी परिस्थिती यावेळी तिकीट देतांना निर्माण झाली. निकाल मात्र १९९१ नव्हे तर १९९९ प्रमाणे लागणार आहे.

… तर तुम्ही देशद्रोही –

पुलवामा हल्ल्यानंतर मोदी सरकारने एअरस्ट्राईक केले. त्यावेळी एक देशभक्त म्हणून माझं मतपरिवर्तन करण्याचा अधिकार मला आहे. माझ्या देशभक्तीची भावना राष्ट्रवादीवाले समजू शकत नसतील तर, त्यांना विचारा एअरस्ट्राईकची कारवाई योग्य आहे की नाही. त्यांचं म्हणणं हो असेल तर त्यांनी माझ्याबरोबर यावे. नाही म्हणणं असेल तर तुम्ही तिकडंच सुखी राहा, तुम्ही देशद्रोही. ‘अशा शद्बात विखेंनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

डॉ. विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून नगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारीसाठी त्यांचे नाव पक्षाच्या संसदीय समितीकडे पाठवल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर विखेंनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. त्यानंतर गुरुवारी नगरला आल्यावर आधी त्यांनी राठोडांची भेट घेतली.

ह्याहि बातम्या वाचा –

कोर्टात न्यायाधीशांना शिव्या देणारा उद्योजक गजाआड

‘पूल दुर्घटनेला पादचारीच जबाबदार’ : भाजप महिला नेता बरळली

Loksabha 2019 : शिवसेनेच्या ‘त्या’ जागेसाठी भाजपची ‘फिल्डींग’ कोणत्या जागेसाठी हे वाचा सविस्तर

राष्ट्रवादीची दुसरी यादी लांबण्याची शक्यता