Buttermilk | उन्हाळ्यात ताकाचं सेवन खूप फायदेशीर ठरतं, पण ‘या’ लोकांसाठी अडचणी वाढू शकतात; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Buttermilk | जवळपास सर्वच दुग्धजन्य पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानले जातात. दुधाचे पदार्थांमध्ये (Dairy Products) अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे (Vitamins And Nutrients) असतात. नियमितपणे त्यांचे सेवन केल्याने फायदा होऊ शकतो. ताक देखील एक अत्यंत फायदेशीर किण्वित दुग्धजन्य पदार्थ आहे. प्रोबायोटिक्स (Probiotics) आणि सर्व पोषक घटक असलेले ताक (Buttermilk) उन्हाळ्याच्या दिवसात खूप फायदेशीर मानले जाते. हे शरीराला हायड्रेटेड ठेवण्याबरोबरच प्रथिने, फायबर, कॅल्शियम, सोडियम आणि व्हिटॅमिन बी १२ (Protein, Fiber, Calcium, Sodium And Vitamin B12) सारखे आवश्यक पोषक द्रव्ये पुरवते. पोट निरोगी राहण्यासाठी आणि आतड्यांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी ताकाचं सेवन करावे.

 

ताकात (Buttermilk) पाणी, लैक्टोज आणि दुधाचे प्रथिने असतात. ताक प्यायल्याने रक्तदाब, हाडे आणि तोंडी आरोग्य (Blood Pressure, Bone And Oral Health) चांगले राहते. तथापि, काही परिस्थितींमध्ये ताक सेवन केल्याने दुष्परिणाम देखील होऊ शकतात.

 

ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Drinking Buttermilk) –
संशोधनात असे आढळून आले आहे की डीहायड्रेशनपासून संरक्षण करण्यासाठी ताकाचे सेवन खुप उपयुक्त आहे. ताकात इलेक्ट्रोलाइट्स, विशेषत: पोटॅशियम आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. ताक पिण्यामुळे उष्णतेशी लढण्यास आणि शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत होते.

 

ताकाने कॅल्शियम वाढते (Buttermilk Increases Calcium) –
हाडांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डी (Calcium, Phosphorus And Vitamin D) हे ताकातून मिळते. हे सर्व पोषक घटक हाडांसाठी खूप फायदेशीर असतात. हाडांची ताकद टिकवून ठेवण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी ताकाचे सेवन महत्त्वाचे ठरते. १३ ते ९९ वयोगटातील लोकांवर ५ वर्षे केलेल्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की, ताकामध्ये असलेल्या फॉस्फरसमुळे हाडांची घनता २.१ टक्क्यांनी वाढते.

कोलेस्टेरॉलवर नियंत्रण (Cholesterol Control) –
हृदयरोगाचे मुख्य कारण मानले जाणार्‍या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवणारे घटक हे ताकात आढळून येतात. ३४ प्रौढांच्या ८ आठवड्यांच्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की, दररोज ४५ ग्रॅम प्रमाणात ताकाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइड्स अनुक्रमे ३ आणि १० टक्क्यांनी कमी होते.

 

जाणून घ्या या दुष्परिणामांबद्दल (Let’s Know About These Side Effects) –
ताकात सोडियमचे प्रमाण (Sodium Level) जास्त असते, म्हणून ते मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे.
जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन केल्याने उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.
तसेच ताकात लैक्टोज असते, ही नैसर्गिक साखर असते. लैक्टोज असहिष्णुतेची समस्या अनेकांना असते, अशा लोकांनी ताकाचे सेवन करू नये.
या परिस्थितीत पोट बिघडणे, अतिसार आणि गॅससारख्या समस्या उद्भवू शकतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Buttermilk | buttermilk chach benefits and side effects healthy drinks in summer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Level Control | डायबिटीजच्या रूग्णांनी सकाळी ब्रश करण्यापूर्वी चघळावीत ‘ही’ पाने, ब्लड शुगर नेहमी राहील कंट्रोल

 

Health Tips | कडू कारल्याची भाजी खाण्याचे 5 गोड फायदे कोणते?; जाणून घ्या 

 

Benefits Of Milk With Gulkand | उन्हाळ्यात दुधासोबत मिसळून प्या ‘हा’ पदार्थ; एकदम आराम वाटेल, जाणून घ्या