ताक हे निरोगी आणि दीर्घायुष्य देणारे पृथ्वीवरचे अमृतच ! जाणून घ्या ताक पिण्याचे फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ताक शरीरासाठी उत्तम आहे. तर पूर्वी लोक जेवणा नंतर ताक घेत होते. त्याचे कारण म्हणजे झालेले अन्न पोटामध्ये गेल्यावर त्याचे पचन व्यवस्थितरीत्या आणि पोट शांत राहावे यासाठी उपयोग होत असतो. तसेच आपण तर जेवणाचे साधे जे काही नियम आहेत ते नियम पाळत नाही आणि आयुष्यभर जेवणाच्या बरोबरीने वेगवेगळ्या गोळ्यांचे सेवन करत राहतो. यापेक्षा जे आवश्यक आहे त्या गोष्टींना प्राधान्य देणे, आणि त्यांचा आहारात समावेश करणे. यामुळे तर आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्याचे वरदानच मिळू शकते. यामुळे ताकाला पृथ्वीवरचे अमृत असे म्हणतात.

ताक हे असे सेवन आहे कि ते जेवणामध्ये अतिशय आरोग्यमय पेय आहे. जसे कि, आपल्या घरात दही असते ते घुसळले जाते, त्यातून लोण्याचा गोळा वर येतो आणि शिल्लक राहिलेलं लोणकढं ताजं ताक पानात वाढलं जातं, तेव्हा तृप्ततेची अनुभूती येते. ते केवळ जिभेला आनंद देत नाही, तर आरोग्याला अनेक फायदे देते.

ताक पिण्याचे फायदे –
– ताक हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पेय आहे. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फोरस, इत्यादी खनिजे, रायनॉप्लेरीन व्हि‍टॅमिन, फोलेट (अ,ब ) समूह ( ड, क ) ही जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.

– ताक हे आंबट, तुरट, रसात्मक असून भूक वाढवणारे आहे. थोडक्यात नियमित ताक प्याल्याने मेद, चरबी, शरीराची जाडी कमी होते. ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे अजीर्णामुळे पोटात साठलेला आमदोष कमी होतो.

– ताक बनविण्यासाठी वापरलेल्या विरजणात लॅक्टोबॅसिलस, स्ट्रेप्टोकोकस जीवाणू असतात. त्यामुळे ताक शरीरासाठी जास्त फायदेमंद असते. ताकाचा रोजच्या आहारात समावेश केला असता प्रकृती चांगली राहते. ताक शरीरातील उष्णता कमी करून शरीराचे तापमान समतोल राखण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात याचा वापर करतात.