Bihar Assembly Election 2020 : LJP सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री गजाआड असतील – चिराग पासवान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोक जनशक्ति पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित निवडणुकीच्या सभेत दावा केला की, त्यांचा पक्ष सत्तेत आला तर सात निश्चयमध्ये घोटाळे करणारे कारागृहाच्या मागे असतील. मग ते अधिकारी असो वा मुख्यमंत्री नितीशकुमार, चिराग पासवान बक्सर येथील डुमराव येथे आयोजित सभांना संबोधित करत होते. त्यांनी राज्य सरकारला घेराव घातला आणि सांगितले की, बिहारमध्ये दारू बंदी अपयशी ठरली आहे. सर्वत्र बेकायदेशीर दारू विकली जात असून त्याचे कमिशन नितीशकुमारांपर्यंत पोहोचत आहे.

चिराग पासवान म्हणाले की, जे मुख्यमंत्री भ्रष्टाचारी, युवाविरोधी आणि बिहार उद्ध्वस्त करणारे आहेत, त्यांना मुख्यमंत्री होण्याचा हक्क आहे का? जनता म्हणाली नाही. यानंतर चिराग यांनी प्रश्न विचारला कि, त्यांना बदलले पाहिजे की नाही, जनतेने पुन्हा त्यांना आपला पाठिंबा दर्शविला. चिराग पासवान म्हणाले की, सात निश्‍चय योजनेतील घोटाळे करणारे अधिकारी असोत किंवा मुख्यमंत्री असो, ते तुरुंगात असतील. लोजपा सरकार स्थापन झाल्यानंतर याची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर सर्वांना तुरूंगात पाठविले जाईल. मग ते मुख्यमंत्री का असेना? सोबतच लोजपा प्रमुख म्हणाले कि, मुख्यमंत्र्यांनी (नितीशकुमार )नकार दिला कि, येथे कारखाना सुरू होऊ शकत नाही. आमच्या राज्यात एक युवाविरोधी मुख्यमंत्री आहेत, ज्यांना आपले तरुण पुढे जाण्याची इच्छा नाही. जर तरुण शिक्षित झाला तर तो त्यांना प्रश्न विचारेल. त्यांना काढून टाकणे आवश्यक आहे.

जेडीयूला केले लक्ष्य
जनता दल युनायटेडचे प्रदेशाध्यक्ष वसिष्ठ नारायण सिंह यांनी चिराग पासवान यांच्यावर मोठा हल्लाबोल बोल केला. जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह म्हणाले की, चिराग पासवान आणि तेजस्वी यादव यांनी हातमिळवणी केली आहे. जेडीयू अध्यक्ष म्हणाले की, चिराग यांना कळले आहे की यावेळच्या निवडणुकीत त्यांची डाळ शिजणार नाही, म्हणून ते सतत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. वशिष्ठ म्हणाले की पंतप्रधानांनी जनतेचा गोंधळ मिटविला असून जनताही सर्व काही व्यवस्थित समजून घेत आहे. तेजस्वी यादव यांच्या नितीशकुमार यांच्यावर थकलेला या वक्तव्यावर वशिष्ठ नारायण सिंह यांनीही कठोर भाष्य केले आणि म्हंटले की, आजही नितीशकुमार यांच्यात कोणत्याही तरुणांपेक्षा अधिक काम करण्याची क्षमता आहे. ते म्हणाले की, नितीश कुमार अजूनही 14 ते 15 तास काम करतात, बिहारच्या लोकांना चांगले ठाऊक आहेत.

You might also like