Buxar Train Accident | ‘नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस’ला अपघात, ४ प्रवाशांचा मृत्यू; १०० पेक्षा जास्त जखमी, दुर्घटनेचे कारण आले समोर!

बक्सर : Buxar Train Accident | बिहार (Bihar) च्या बक्सर (Buxar) मध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर जंक्शनजवळ नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस ट्रेन (North East Express Train) चे २३ डब्बे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. काल रात्री दहाच्या सुमारास हा अपघात (Buxar Train Accident ) झाला. अपघातानंतर रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले (North-East Express Derailed).

नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले
मिळालेल्या माहितीनुसार, दानापूर-बक्सर रेल्वे सेक्शनमधील रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी रात्री उशिरा १२५०६ डाउन नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस रुळावरून घसरली आणि अपघात झाला. या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर १०० प्रवासी जखमी झाले. रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.

ट्रेन अपघातग्रस्त का झाली?
अपघाताची माहिती मिळताच डुमरावचे एसडीओ कुमार पंकज आणि ब्रह्मपूर पोलिस स्टेशन मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी लोकांची गर्दी झाली होती. सामान्य लोकही बचाव कार्य सहभागी झाले आहेत. रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, बक्सरवरून निघाल्यानंतर नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस नेहमीच्या वेगाने धावत होती. रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ पॉईंट बदलताना ट्रेनला जोरदार झटका बसला आणि ती अपघात झाला. (Buxar Train Accident)

अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांचे ट्विट
बक्सर दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट केले की, अपरिमित हानीबद्दल तीव्र शोक. ट्रेन रुळावरून घसरण्याचे मूळ कारण शोधले जाईल.

हेल्पलाइन क्रमांक जारी
या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रेल्वे अपघातानंतर पाटणा, दानापूर आणि आराहसाठी रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
याशिवाय कॉमन हेल्पलाइन नंबर ७७५९०७०००४ जारी केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Narcotics Control Bureau | पुणे ग्रामीण भागात मुंबई नार्कोटिक्स विभागाचे छापे, अंमली औषध साहित्य जप्त

12 October Rashifal | मिथुन आणि कर्कसह ‘या’ चार राशीवाल्यांसाठी दिवस चांगला, होईल धनलाभ