‘जनऔषधी’च्या दुकानातून ‘खरेदी’ करा १० रुपयात ४ ‘सॅनेटरी’ नॅपकिन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांच्या आरोग्याचा आणि मासिक पाळीच्या दिवसांचा विचार करता या काळात इंफेक्शनपासून वाचण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. असे असताना देखील ग्रामीण भागात जवळपास ४० टक्के महिला अनहायजेनिक पद्धतींचा वापर करतात. याचा त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. याचा विचार करत पंतप्रधान जनऔषधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानात आणि जन औषधी सुविधा केंद्रांवर सेनेटरी नॅपकिनची व्यवस्था करण्यात आली आहे.

१० रुपयात ४ सॅनेटरी नॅपकिन –

सरकारच्या मते महिला रेशन खरेदी करताना नॅपकिन देखील खरेदी करु शकतात. या योजने अंतर्गत सॅनेटरी नॅपकिनच्या प्रति पॅडची किंमत २.५० रुपये असणार आहे. सॅनेटरी नॅपकिनच्या एका पाकिटात ४ पॅड असणार आहेत. याची किंमत १० रुपये असणार आहे. पंतप्रधान जन औषधी योजनाचे उद्दिष्ट आहे की, लोकांना स्वस्त दारात औषधे उपलब्ध करुन देणे. PMJAY केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी योजनेमधील एक योजना आहे.

२८ लाख सॅनेटरी पाकिटाची विक्री –

‘जनऔषधी सुविधा’ याअंतर्गत सेनेटरी नॅपकिनची विक्री २०१८-१९ मध्ये सुरु करण्यात आली, आतापर्यंत ‘जनऔषधी सुविधा’ अंतर्गत सेनेटरी नॅपकिनचे २८ लाख पाकिटे विकण्यात आली. PMJAY अंतर्गत आतापर्यंत देशभरात ५४४९ रिटेल आउटलेट सुरु करण्यात आले आहेत. या अंतर्गत विक्री करण्यात येणाऱ्या औषधांच्या लॉजिस्टिक्स आणि वितरणासाठी तीन आधुनिक गोदाम स्थापित करण्यात आले आहेत. जे गुरुग्राम, बेंगलोर आणि गुवाहटीमध्ये आहेत. यासंबंधित माहिती केंद्रीय रसायन मंत्री डी. वी. सदानंद गौडा यांनी लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तरात दिली आहे.