TikTok मुळं घोरपड खरेदी-विक्रीच्या व्यवहाराचा ‘पर्दाफाश’ !

वर्धा : पोलिसनामा ऑनलाईन – अल्पावधीतच लोकप्रिय झालेले आणि वादग्रस्त ठरलेल्या टिकटॉक ऍपमुळे एक बेकायदेशीर व्यवहार उघडकीस आला आहे. घोरपडीचा खरेदी विक्री व्यवहार टिकटॉक ऍपमुळे उघडकीस आला आहे. हा व्यवहार उघडकीस आल्यानंतर पळून जाणाऱ्या तीन जणांपैकी एकाला अटक करण्यास पोलिसांना यश मिळाले आहे.

आर्वी नजीक शिरपूर रोड परिसरातील पारधी वसाहतीत दुर्मिळ घोरपडीची खरेदी विक्री होत असल्याचा टिकटॉक व्हिडीओ सोशलमिडीयातून व्हायरल झाला. एकाने हा व्हिडीओ जिल्हा उपवनसंरक्षक डॉ. सुनील शर्मा यांना व्हाट्सअपवरून पाठवला. त्यांनी ही माहिती आर्वीचे वनाधिकारी दिलीप दुडे यांना दिली. व्हिडिओतून हा परिसर शिरपूर रोड परिसरातील असल्याचे कळाले. ही माहिती मिळताच वनखात्याच्या टीमने पारधी वसाहतीवर छापा मारला.

एका कर्मचाऱ्याने सहाशे रुपयात ही घोरपड खरेदी करण्याचे नाटक केले. आरोपींना हा सापळा असल्याचे कळताच आरोपींनी दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. वनखात्याच्या टीमला मारहाण करत आरोपी पिशवी घेऊन पळून गेले. यानंतर वनाधिकारी दुडे यांना आर्वी पोलिसांकडे तक्रार केली. तीनही आरोपी पळून गेल्यामुळे वनखात्याचा सापळा पूर्णपणे फसला. अखेर राजपूत भोसले या आरोपीस पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like