3 ते 4 लाखांत खरेदी करा i20 आणि Verna सारख्या गाड्या, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपल्यालाही स्वत:ची कार खरेदी करायची असेल, परंतु आपले बजेट कमी असेल तर टेन्शन घेण्याचे कारण नाही. कमी बजेटमध्येही आपण Hyundai Verna आणि Hyundai i20 सारख्या गाड्या फक्त 3 लाख ते 4 लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकता. कार्स 24 ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर चांगली कंडिशन सेकंड हॅंड कार विक्रीसाठी उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त दिल्लीत अशी अनेक कार मार्केट्स आहेत जिथे तुम्हाला चांगल्या स्थितीत आणि योग्य किमतीत सेकंड हँड कार मिळू शकते.

Hyundai Verna- Cars24 प्लॅटफॉर्मवर Hyundai Verna चा 2011 मॉडेल FLUIDIC 1.6 SX CRDI विक्रीसाठी उपलब्ध आहे. कार 52,525 कि.मी.पर्यंत चालली आहे आणि हे वाहन पहिल्या मालकाद्वारे 3,32,524 रुपयांना विकले जात आहे. या कारचे डिजल वेरिएंट विकले जात आहेत.

Hyundai i20- व्यतिरिक्त i20 MAGNA O 1.4 CRDI, 2013 मॉडेलही विक्रिसाठी उपलब्ध आहे. ही कार 33,825 किमी चालली आहे. हे वाहन पहिल्या मालकाद्वारे 3,14,899 रुपयांना विकली जात आहे. या कारचे डीजल वेरिएंट विकले जात आहेत. वर नमूद केलेली ही वाहने दिल्ली सर्कलमध्ये उपलब्ध आहेत.

दिल्लीच्या करोल बागमध्ये सेकंड-हँड कार बाजारपेठ सर्वांत मोठी आहे. या मार्केटमध्ये मारुती वॅगनआर केवळ 50 ते 60 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तथापि, ही मॉडेल्स 10 वर्षांपर्यंतची असू शकतात. नवीन वॅगनआरची एक्स-शोरूम किंमत 4.45 लाखांपासून सुरू होते. त्याचबरोबर रस्त्यावर त्याची किंमत अंदाजे 5.50 लाख रुपयांपर्यंत जाते. इतक्या कमी किमतीत आपण सहजपणे सेकंड हँड कार खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त तुम्हाला या बाजारामध्ये आणखी चांगले पर्याय मिळू शकतात.

सेकंड हँड कारला वित्तपुरवठा करता येतो
जर आपण दिल्लीमध्ये सेकंड हँड खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मग आपणास येथे कारसाठी वित्तपुरवठा करण्याची सुविधादेखील मिळेल. यासाठी तुम्हाला सेकंड हँड कार मार्केटमधील डीलर्सशी संपर्क साधावा लागेल आणि काही महत्त्वाची कागदपत्रे द्यावी लागतील. यानंतर कार विक्रेते सेकंड हँड कारची वित्तपुरवठा करू शकतात.