अक्षय्य तृतीयेनिमित्त सोने खरेदीची सुवर्णसंधी ; केवळ एक रुपयात २४ कॅरेट सोने मिळवा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने तुम्हाला एक रुपयांत सोने खरेदीची सुवर्णसंधी मिळणार आहे. पेटीएमनं १ रूपयामध्ये सोनं खरेदीची योजना सुरू केली आहे. तुम्ही १ रूपयापासून ते १. ५० लाख रूपयापर्यंत सोनं खरेदी करू शकता. तुम्ही खरेदी करत असलेलं सोनं २४ कॅरेटचं असणार असा दावा कंपनीनं केला आहे.

पेटीएमद्वारे तुम्हाला केवळ एक रूपयामध्ये सोनं खरेदी करता येणार आहे. पेटीएमने ‘डिजीटल गोल्ड’ या नावाने ‘वेल्थ मॅनेजमेंट’ची नवी योजना सुरु केली असून  या योजनेंतर्गत तुम्ही वर्षभर कोणत्याही दिवशी डिजीटल पद्धतीने सोने खरेदी करु शकता. तुम्ही पेटीएमच्या मोबाईल अ‍ॅपनेही खरेदी करु शकता. वजनावर सोने खरेदी करत असाल तुम्हाला बाजाराच्या किंमतीने सोनेची किंमत द्यावी लागेल. खरेदी केलेलं सोनं लॉकरमध्ये ठेवलं जाणार आहे. ज्यावेळी तुम्हाला हवं त्यावेळी तुम्ही सोनं घरी घेऊन जाऊ शकता.

असे करा पेटीएमद्वारे  सोने खरेदी –

पेटीएम अ‍ॅप ओपन करा त्यावर तुम्हाला गोल्ड हा पर्याय दिसेल. त्यावर क्लीक करून तुम्ही सोने खरेदी करू शकता. यामध्ये १,२,५,१० आणि २० ग्रॅम सोन्याचे सिक्के असतात. याशिवाय तुम्हाला कॅशबॅक आणि डिजीटल सोनं खरेदी करण्याचा पर्याय देखील दिला जातो. तुम्ही १ रूपयापासून ते १. ५० लाख रूपयापर्यंत सोनं खरेदी करू शकता. पेटीएम सोन्याच्या शुद्धतेची १०० टक्के हमी घेते. किमान १ ग्रॅम सोनं तुमच्या घरी सुरक्षित पोहोचवलं जातं.

बुलियन इंडियाच्या माध्यमातून करा सोने खरेदी –

पेटीएम गोल्डशिवाय बुलियन इंडियाही तुम्हाला या प्रकारची सेवा देते. पण, त्यासाठी तुम्हाला किमान ३०० रूपयाचं सोनं खरेदी करावं लागेल. यासाठी तुम्हाला बुलियन इंडियामध्ये खाते खोलावे लागेल. पेटीएम गोल्डप्रमाणे बुलियन इंडियाही तुम्हाला सोन्याची होम डिलीव्हरी देते. बुलियन इंडियाच्या माध्यमातून खरेदी केलेलं सोनं देखील MATC – PMP लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलं जातं.