खुशखबर ! घरबसल्या 1 रुपयात खरेदी करा सोनं, मिळणार ‘हे’ फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील नागरिकांना सोन्याच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात आवड आहे. त्यामुळे भारतीय नागरिक सोने कितीही महाग झाले तरीही मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असतात. त्यात जर एक रुपयात सोने घरी घेऊन जाण्याची संधी मिळाली तर काही सांगायला नको. त्यामुळे आता पेटीएम बरोबर अनेक ई-वॉलेट कंपन्या तुम्हाला एक रुपयात सोने खरेदी करण्याची संधी देत आहेत. इथे मिळणारे सोने हे २४ कॅरेटचे असून जवळपास १०० टक्के शुद्ध सोने मिळेल. या ठिकाणी सोने खरेदी केल्यानंतर ते ठेवण्यासाठी तुम्हाला लॉकरची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. याठिकाणी तुम्ही एक रुपयाच्या सोन्याबरोबरच हळूहळू हि रक्कम वाढवून गुंतवणूक वाढवू शकता.

या योजनेसंदर्भातील माहिती
१) असे खरेदी करा एक रुपयात सोने
पेटीएमवरून सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला ऍपच्या गोल्ड पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी हवे तितक्या रकमेचे सोने खरेदी करू शकता. एकावेळी तुम्ही याठिकाणी १ रुपयापासून ते दीड लाख रुपयांपर्यंत सोने खरेदी करू शकता.

२) सुरक्षित ठेव
कंपनीने केलेल्या दाव्यानुसार याठिकाणी विक्री होणारे सोने हे १०० टक्के शुद्ध असून तुम्ही खरेदी केलेले सोने तुम्ही स्वतः लॉकरमध्ये ठेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही हवे तेव्हा घरी देखील घेऊन जाऊ शकता.

३)बुलियन इंडिया वर देखील मिळणार सोने
पेटीएम खेरीज तुम्ही बुलियन इंडिया कडून देखील अशा प्रकारे तुम्ही सोने खरेदी करू शकता. मात्र या ठिकाणी तुम्हाला कमीतकमी ३०० रुपयांचे सोई खरेदी करायचे आहे. फिनकर्व बुलियन इंडिया हि खासगी कंपनी असून याठिकाणचे सोने सर्वात सुरक्षित देखील आहे.

४) हवे तेव्हा घरी घेऊन जा
पेटीएम वरून खरेदी केलेले हे सोने १०० टक्के शुद्ध असून तुम्ही हवे तेव्हा हे सोने घरी देखील घेऊन जाऊ शकता. १,२,५,१० आणि १२ ग्रॅमच्या शिक्क्यांच्या रूपात तुम्ही हे सोने घरी घेऊन जाऊ शकता.

आरोग्यविषयक वृत्त –