आता 819 रुपयांचा गॅस सिलिंडर फक्त 119 रुपयांत खरेदी करा, जाणून घ्या ऑफर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंधन दरवाढीबरोबरच गॅस सिलिंडरच्या दरात मोठी भाववाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशा महागाईच्या काळात Paytm ने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या जबरदस्त ऑफरचा फायदा घेऊन तुम्हाला ८१९ रुपयांचा गॅस सिलिंडर अवघ्या ११९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत ही ऑफर वैध आहे. म्हणजे Paytm वरून सिलिंडर बुक करण्यासाठी अवघ्ये पाच दिवस शिल्लक आहेत.

ऑनलाइन पेमेंट अ‍ॅग्रीगेटर Paytm ची ग्राहकांसाठी ही ऑफर असून, या अंतर्गत सिलिंडर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ७०० रुपयापर्यंतचा कॅशबॅक मिळेल. पेटीएमवरून सिलिंडर बुकिंग करणार्‍यांना ७०० रुपयांचा कॅशबॅक स्क्रॅचकार्ड मिळणार आहे. Paytm या अ‍ॅपवरुन पहिल्यांदा गॅस बुकिंग करणाऱ्यांसाठीच ही ऑफर राहणार आहे. जो कोणी पहिल्यांदा सिलिंडर बुक करेल त्यांना पेटीएमवरून पेमेंट पे करावे लागेल. त्यानंतर ऑफर आपोआप जनरेट होते. पेटीएमने या ऑफरसाठी अनेक गॅस कंपनीसोबत पार्टनरशीप केली आहे.

या ऑफरचा फायदा Paytm App वरून घ्यायचा असेल तर सर्वात आधी मोबाईलवर अ‍ॅप डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर पेटीएमला ओपन करून Recharge and Pay Bills सेक्शनवर जा. त्यानंतर Book a Cylinder ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला घरपोच सिलिंडर करणार्‍या एजन्सीची निवड करा. त्यानंतर आपला रजिस्टर मोबाइल नंबर किंवा LPG ID एन्टर करा. यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन दिसेल, आता पेमेंट करून ऑफर वर जा. या ठिकाणी FIRSTLPG प्रोमो कोड टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला फक्त ११९ रुपयांत सिलिंडर मिळू शकेल.