खूशखबर ! Flipkart ची भन्नाट ऑफर; फ्रीमध्ये मिळणार स्मार्टफोन खरेदीची संधी, जाणून घ्या कसं ?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांची भरमसाठ सवलती देण्यासाठी चढाओढ असते. आताही Flipkart वरून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. Flipkart आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर सुरु करणार असून या ऑफरअंतर्गत तुम्हाला फ्रीमध्ये स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. 17 जानेवारीपासून ऑफरला सुरुवात होणार आहे.

Flipkart ने हा भन्नाट ऑफर आणली असून यामध्ये ग्राहकांना विविध कंपनीच्या स्मार्टफोन आणि विविध वस्तुंच्या खरेदीवर भरघोस सूट दिली आहे. ग्राहकांना ऑफरमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि इतर गोष्टी ऑफर प्राईजमध्ये खरेदी करता येते. मात्र आता कंपनी एका ऑफरमध्ये ग्राहकांना मोफत स्मार्टफोन खरेदीची संधी देत आहे. फ्लिपकार्ट स्मार्टपॅक प्रोग्राम एक सब्सक्रिप्शन बेस्ड सर्व्हिस आहे. यासाठी ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करताना 12 महिने किंवा 18 महिन्यांच सब्सक्रिप्शन खरेदी करावे लागेल. सब्सक्रिप्शनचा कालावधी संपल्यानंतर ग्राहकाला त्या स्मार्टफोनचा 100 टक्के कॅशबॅक मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

Flipkart ची खास ऑफर
फ्लिपकार्ट युजर्सला गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ स्मार्टपॅक ऑफर करेल. याचा कालावधी 12 महिने ते 18 महिनांपर्यंत राहणार आहे. या स्मार्टपॅकचे मासिक शुल्क 399 रुपयांपासून सुरू होणार आहे. ग्राहक नवीन स्मार्टफोन खरेदी करताना यापैकी एका स्मार्टपॅकची आपल्या आवडीनुसार निवड करू शकतात. स्मार्टपॅकची खरेदी केल्यानंतर ग्राहकांना SonyLIV, Zee5 Preimum, Voot Select, Zomato Pro अशा सर्व्हिसेस मिळणार आहेत.

या आहेत अटी
स्मार्टपॅकचा सब्सक्रिप्शन टाईम संपल्यानंतर ग्राहकांना स्मार्टफोनचे 100 टक्के पैसे परत मिळणार आहेत. मात्र त्यासाठी आपला फोन चालू स्थितीत ठेवावा लागेल. फोन चालू स्थितीत असण्यासह फोनवर आयएमईआय नंबर दिसायला हवा. गोल्ड प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 टक्के कॅशबॅक मिळेल. सिल्व्हर पॅकमध्ये 80 टक्के मनीबॅक मिळेल. तर ब्रॉन्झ पॅकमध्ये ग्राहकांना आपल्या स्मार्टफोनच्या खरेदीवर 60 टक्के पैसे परत मिळणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.