मुलांसाठी ‘प्रेम’ नव्हे तर त्यांच्या जीवाशी ‘खेळ’, तपासणीत 67 % खेळणी ‘बेकार’ निघाली, ‘या’ आजारांचा धोका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लहान मुलांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या खेळण्यावर पालक यासाठी थोडे जास्त पैसे खर्च करतात जेणेकरुन हे खेळणं चांगल्या दर्जाचं असावं आणि त्याने मुलांच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. परंतु नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार जवळपास 67 टक्के खेळणी परीक्षण चाचणीत धोकादायक ठरली आहेत. हे परीक्षण क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाकडून जारी करण्यात आले आहे.

या अहवालानुसार 66.90 टक्के आयात खेळण्यांचे परीक्षण फेल झाले आहे. फक्त 33.10 टक्के खेळणी परीक्षणाच्या चाचणीत पास होऊ शकली. क्यूसीआयने या खेळात चाचणीसाठी दिल्ली आणि एनसीआर स्थित मार्केटमधून खेळणी घेतली होती.

एकूण 121 विविध प्रकारच्या नमून्याचे परीक्षण करण्यासाठी परीक्षण तपासणी लॅबमध्ये पाठवण्यात आले. क्यूसीआय अहवालानुसार यात 30 टक्के प्लास्टिक खेळणी सुरक्षेचे मानक पूर्ण करु शकली नाहीत. त्यात हेवी मेटलचे प्रमाण जास्त मिळाले. 80 टक्के प्लास्टिकचे खेळणे मॅकेनिकल आणि फिजिकल सुरक्षेत फेल झाले.

सॉफ्ट टॉय –

सॉफ्ट टॉय खेळण्याचा विचार केला तर त्यातील 45 टक्के खेळणी नमूना चाचणीत फेल ठरले. त्यात पॅथालेट्सचे प्रमाण जास्त होतं. तर इलेक्ट्रॉनिक खेळण्याचा विचार केला तर 75 टक्के खेळणी फेल ठरली.

भारतात येणारी 85 टक्के खेळणी चीन, श्रीलंका, मलेशिया, जर्मनी, हांकगॉक आणि यूएसएवरुन आयात होतात. क्यूसीआयचे सेक्रेटरी जनरल आरपी सिंह यांनी सांगितले की मॅकेनिकल परीक्षणात फेल ठरलेली खेळणी लहान मुलांच्या त्वचेसाठी घातक असतात. त्यामुळे त्वचा खराब होऊ शकते. जर खेळण्यात कोणत्याही प्रकारचे केमिकल असेल तर अनेकदा कॅन्सर होण्याची शक्यता आधिक वाढते.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/