फायद्याची गोष्ट ! ‘कोरोना’च्या संकटकाळात सुवर्णसंधी, आता घर खरेदी करण्याचे ‘हे’ 4 फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना महामारीने प्रत्येक सेक्टरला प्रभावित केले आहे, ज्यामध्ये एक रियल इस्टेटसुद्धा आहे. रियल इस्टेट सेक्टर मागील सुमारे दोन वर्षांपासून दबावाखाली आहे. परंतु, या दरम्यान ग्राहकांसाठी खुप चांगली संधी आहे. अगोदरच संकटात सापडलेल्या रियल इस्टेटला कोरोनाने आणखी बॅकफुटवर ढकलले आहे.

जर तुम्ही मागील दोन वर्षांपासून आपल्या घराच्या शोधात आहात, तर तुम्हाला सध्या चांगली संधी आहे. कोरोनामुळे तुम्ही आता घर खरेदी करून चांगली बचत करू शकता. मात्र, काही जाणकारांचे म्हणणे आहे की, अजूनही प्रॉपर्टीच्या किमतींमध्ये घसरण होऊ शकते.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, प्रथमच होम लोनचे व्याजदर 7 टक्क्यांच्या खाली आहे. एवढेच नव्हे, प्रॉपर्टीच्या किमतीसुद्धा पाच वर्षांत सर्वात खालच्या स्तरावर आहेत. खरेदीदार सरकारच्या टॅक्स बेनिफिट स्कीमचा लाभसुद्धा घेऊ शकतात.

एनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंटचे चेअरमन अनुज पुरी यांचे म्हणणे आहे की, ग्राहकांसाठी ही कोरोना संकटात चांगली संधी आहे, ज्यांना कोणतीही आर्थिक अडचण नाही, ते गुंतवणूक करू शकतात, किंवा राहण्यासाठी घर खरेदी करू शकतात.

एनरॉकनुसार सध्या देशातील 7 मोठ्या शहरांमध्ये सुमारे 15.92 लाख अंडर कन्स्ट्रक्शन घरे आहेत, जी लवकरच तयार होतील. बिल्डरचा फोकस रेडी घरे विकण्यावर आहे. मागच्या काही दिवसात एसबीआयच्या प्रमुखांनी म्हटले होते की, बिल्डर्सनी तयार घरे अगोदर विकावीत नंतर नवीन प्रोजेक्टचा विचार करावा.

अनुज पुरी म्हणाले की, ग्राहक अंडर कन्स्ट्रक्शनच्या तुलनेत रेडी घर खरेदी करणे पसंत करत आहेत. त्यांनी सांगितले की, लोकांना या कोरोना संकटात रिस्क घ्यायची नाही. याशिवाय रेडी टू मूव्ह घर अंडर कन्स्ट्रक्शनच्या तुलनेत सध्या फायद्याचा सौदा आहे. कारण बिल्डर पैसा जमवण्यासाठी तयार घरे सवलतीसह विकण्यास तयार आहेत. याशिवाय अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग केव्हा तयार होईल, याचा अंदाज लावणे अवघड आहे. कारण मोठ्या शहरात मजूरांचीही टंचाई आहे.

ग्राहकांनी आत्ता घर खरेदी केल्यास चार मोठे फायदे होऊ शकतात. होम लोनवर व्याजदर कमी आहे आणि बहुतांश बिल्डर मोठे डिस्काउंट ऑफर करत आहेत.

हे आहेत चार फायदे

1. घरांच्या किमतीत घसरण
सर्वसामान्यांना घर खरेदी करण्यासाठी हिच योग्य वेळ आहे, आता पाहिले तर घरांच्या किमती पाच वर्षातील सर्वात कमी आहेत. जर वेगाने डिमांड वाढली तर पुन्हा घरे महाग होऊ शकतात.

2. कमी व्याजदर
बँकांचे व्याजदर सुद्धा खुप खाली आले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना ईएमआय कमी बसेल. एसबीआय 30 लाख रुपयांपर्यंतच्या होम लोनवर 7.35 ते 7.75 टक्के व्याजदर ऑफर करत आहे. तर एचडीएफसी बँक वार्षिक 7.35 ते 9.05 व्याजदरावर होम लोन देत आहे.

3. क्रेडिट लिंक सबसिडी स्कीमचा फायदा
पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत 2021 पर्यंत घर खरेदी केल्यास व्याजात सरकारकडून 2.67 लाख रुपयेपर्यंत सबसिडी दिली जाते. ही स्कीम 31 मार्च 2020ला बंद झाली होती, परंतु कोरोना संकटामुळे ती वाढवून 31 मार्च 2021 पर्यंत केली आहे. घर खरेदीदारांसाठी ही चांगली संधी आहे. या योजनेला को क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम नाव दिले आहे.

4. प्रॉपर्टीत गुंतवणूक
सध्या प्रॉपर्टीचे दर खुपच घसरलेले आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक एक पर्याय होऊ शकतो. अपेक्षा केली जात आहे की, कोरोना संकटांनतर प्रॉपर्टीमध्ये तेजी येऊ शकते. कारण सरकारचा फोकस यावर्षी रियल एस्टेट सेक्टरवर असू शकतो. मागील सुमारे 4 वर्षांपासून प्रॉपर्टीच्या किमतींमध्ये वाढ दिसून आलेली नाही. यासाठी हे वर्ष प्रॉपर्टी गुंतवणुकदारांसाठी महत्वाचे आहे. मात्र, घर खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करावा आणि तज्ज्ञांची मदत घ्यावी, नंतरच निर्णय घ्यावा.