संयुक्त नावाने घर खरेदी करणे खूपच फायदेशीर ‘डील’, जाणून घ्या तज्ञांचे मत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संयुक्त नावाने घर खरेदी केल्यास काय फायदा होऊ शकतो, हे आपण आज जाणून घेणार आहोत.

तुम्ही कोणत्या लोकांना बनवू शकता संयुक्त मालक ?
मालमत्ता खरेदी करताना तुम्ही कोणाला संयुक्त मालक बनवू शकता आणि कोणाला नाही, याच्याशी संबंधित कोणताही कायदा नाही. तुम्ही जवळचा नातेवाईक, व्यवसाय भागीदार किंवा अगदी जवळचा मित्र देखील संयुक्त मालक बनवू शकता. मालमत्ता खरेदी करताना संयुक्त धारकाने देखील पैशाचे योगदान देण्याची आवश्यकता नाही.

जरी तुम्ही सर्व पैसे एकट्याने देत असलात तरीही आपल्या पत्नीला किंवा मुलांना मालमत्ता करार पत्रात संयुक्त मालक म्हणून समाविष्ट करणे फायदेशीर आहे. तुम्ही विवाहित नसल्यास आपल्या पालकांना किंवा भावाला संयुक्त मालक बनवू शकता. मालमत्ता खरेदी करताना तुम्ही कितीही लोकांना संयुक्तपणे मालक बनवू शकता.

जाणून घ्या संयुक्त नावाने मालमत्ता खरेदी करण्याचे काय आहेत फायदे?

१. गृह कर्ज घेताना
गृह कर्ज देताना बँका सर्व संयुक्त मालकांना एकत्रितपणे लेनदार बनवण्यावर जोर देतात. तुम्ही तुमच्या पती/ पत्नी, पालक किंवा मुलांसारख्या जवळच्या नातेवाईकांना सह-कर्ज घेवून कर्जासाठी अर्ज केल्यास तुम्हाला अधिक सहजपणे कर्ज मिळू शकते. बहुतेक बँका या जवळच्या नातेवाईकांव्यतिरिक्त इतर दुसऱ्या कर्जदारांच्या अर्जाकडे फारसे लक्ष देत नाहीत. इतकेच नाही तर एखादा मित्र, जोडीदार किंवा भाऊ किंवा बहीण यांना संयुक्तपणे मालक केल्यास तुमचा गृह कर्ज अर्ज नाकारलाही जाऊ शकतो.

२. मालमत्ता एकाच्या नावावरून दुसर्‍याच्या नावावर करण्यात नाही येत कोणतीही अडचण
आजकाल बहुतेक लोक गृहनिर्माण संस्थांमध्ये फ्लॅट खरेदी करतात. अशात संयुक्त नावाने मालमत्ता खरेदी करणे चांगले असते. देव न करो पण उद्या जर एखाद्या संयुक्त धारकाला काही झाले, तर सामान्यत: संस्था संयुक्त धारकाच्या नावावर मालमत्ता करते. यासाठी ते सामान्यत: प्रोबेट किंवा अन्य कायदेशीर उत्तराधिकाऱ्यांकडून एनओसी मागत नाही. मात्र सोसायटीकडे उमेदवारी अर्ज सादर करण्याची तरतूद असते, पण संयुक्त मालकापेक्षा नॉमिनीला फ्लॅट हस्तांतरण करणे अधिक अवघड असते.

३. आयकर आणि इतर फायदे
संयुक्त नावाने प्रॉपर्टी खरेदी केल्यास तुम्हाला अधिक चांगले कर नियोजन करण्यातही मदत होते. गृह कर्जावर कलम ८०सी किंवा कलम २४बी अंतर्गत निवासी कर्जाच्या व्याजावर मिळणारी कर सवलत केवळ एक व्यक्तीच मागू शकते. या दोन्ही प्रकरणांमध्ये कर सवलतीचा फायदा मालक किंवा संयुक्त मालकाला मिळतो. गृहकर्जाशी संबंधित कर सवलतीचा लाभ तुम्हाला अशा प्रकरणात मिळणार नाही, जिथे कर्ज तुमच्या नावावर आहे पण घर तुमच्या नावावर नाही.

आजच्या काळात शहरांमध्ये ५० लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत चांगले घर मिळणे कठीण आहे. अशात जर तुम्ही पाहिले, तर आठ टक्के दराने ५० लाखावर दर वर्षी ४ लाख रुपये देय असते. जर तुम्ही स्वतःला राहण्यासाठी घर घेतले आहे आणि घर आणि कर्ज फक्त तुमच्या नावे असेल, तर तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर सवलत मिळवू शकता. मात्र तुम्ही संयुक्त नावाने तीच मालमत्ता घेतल्यास दोन्ही संयुक्त धारक प्रत्येकी दोन-दोन लाख रुपयांच्या कर सवलतीचा दावा करु शकतात. देयकाच्या बाबतीत दोन्ही संयुक्त धारक कर सवलत मिळण्याचा लाभ अशाच प्रकारे घेऊ शकतात.

४. स्टॅम्प ड्युटीमध्येही मिळू शकतो दिलासा
काही प्रकरणांमध्ये महिलेच्या नावे रजिस्ट्री असल्यास कमी मुद्रांक शुल्क भरावे लागते. तसेच गृहकर्जासाठी महिला जर पहिली अर्जदार असेल, तर काही बँका व्याजदरामध्ये थोडी सवलत देतात.

या सर्व बाबींवरून हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे की, संयुक्त नावाने घर खरेदी करणे हा अनेक बाबतीत फायदेशीर करार आहे. यामुळे मालमत्ता एका नावावरून दुसर्‍या नावावर हस्तांतरित करण्यास मदत होते. तसेच कर सवलतीचा फायदा देखील मिळतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like