शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीला नव्हे तर ‘या’ पक्षाला पाडलं खिंडार, प्रवेशासाठी नेते मातोश्रीवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाने सुरुंग लावल्यानंतर शिवसेनेने हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला बोईसर मतदारसंघात खिंडार पाडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गज नेते सत्ताधारी भाजपा-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यात आता शिवसेनेने बहुजन विकास आघाडीला सुरुंग लावला असून या पक्षातील नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांच्यासोबत आगरी सेनेचे नेत जनार्दन पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना प्रवेशासाठी आमदार विलास तरे आणि जनार्दन पाटील मातोश्रीवर आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे दोन नेते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आगोदर विद्यमान आमदाराने पक्ष सोडल्याने बहुजन विकास आघाडीच्या अडचणी वाढणार आहेत.

विद्यमान आमदार विलास तरे यांचे बोईसर विधानसभा मतदारसंघात चांगली पकड आहे. शिवसेनेने तरे यांना पक्षात घेतल्याने या ठिकाणी बहुजन विकास आघाडीला खिंडार पडले आहे. तर आगरी सेनेचे नेते जनार्दन पाटील यांचा स्थानिक मतदारांवर मोठा प्रभाव असून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने या ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढणार आहे. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजपा- शिवसेनेत प्रवेश केला आहे तर काही जण वाटेवर आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like