भारताची चॅम्पियन ‘सुवर्ण’कन्या सिंधूची ‘एवढी’ कमाई, वाचून व्हाल थक्क

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या पी. व्ही. सिंधूने अखेरीस अंतिम फेरीतील अपयश मागे सोडून जेतेपदाला गवसणी घातली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सिंधूने यावेळी जेतेपद पटकावले. भारतीय खेळाडू सिंधूला इंडियन मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी आहे. खेळाडूंमध्ये मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी असणारी बॅडमिंटनपटू म्हणून सिंधूकडे पाहिले जाते.

सिंधूने जपानच्या नोहामी ओकुहारावर एकतर्फी विजय मिळवला आहे. सिंधूने ओकुहाराचा 21-7, 21-7 ने पराभव केला. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू जगातील सर्वात श्रीमंत महिला खेळाडूपैकी एक बनली आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीमध्ये सिंधू जगभरातील श्रीमंत खेळाडूंच्या यादीत असणारी एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. या यादीमध्ये सेरेना विलियम्स पहिल्या क्रमांकावर असून या यादीत सिंधू ही एकमेव बॅडमिंटन खेळाडू आहे.

टेनिस खेळाडू सेरेना विलियम्सची कमाई 29.2 मिलियन डॉलर म्हणजे 207 कोटी आहे. तर सिंधू वर्षाला 5.5 मिलियन डॉलर म्हणजेच 38.9 कोटी रुपयांची कमाई करते. सेरेनाला जाहिरातीच्या माध्यमातून 177 कोटी रुपये मिळतात. तर भारताच्या या स्टार खेळाडूला 35.4 कोटी रुपये मिळतात. एवढेच नाही तर, बीडब्लूएफ वर्ल्ज टूर जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू सिंधू इंडियन मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी असणारी खेळाडू आहे.

आरोग्यविषयक वृत्त –