…. हि स्पर्धा जिंकणारी पी.व्ही. सिंधू ठरली पहिली भारतीय 

 गुआंगझू : अंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था- BWF World Tour Finals हि स्पर्धा गुआंगझू या ठिकाणी सुरु असून या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाऊन सात वेळा पराभूत झालेली भारतीय  बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आज अखेर या स्पर्धेत विजेती ठरली. तिचा आजचा विजय हा सुवर्ण विजय मानला जात आहे. कारण या स्पर्धेत विजयी होणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

पी.व्ही.सिंधू हिने तिची प्रतिस्पर्धी ओकुहारा हीचा २१-१९, २१-१७ अशा सेट मध्ये पराभव घडवत विजयावरती आपले नाव कोरले आहे. सिंधू हिच्या कारकिर्दीचा हा ३०० वा विजय झाला असून या वर्षी कोणताही विजय नमिळवलेल्या पी व्ही सिंधूने हा विजय खेचत या वर्षीचा शेवट चांगला केला आहे.

सिंधू याच स्पर्धेत अगोदर सात वेळा पराभूत झाली होती. काल सिंधूने सेमी फायनल मध्ये तिची प्रतिस्पर्धक रॅट्चनॉक इंटानॉन हिला २१-१६, २५-२३ या सेट मध्ये पराभूत केले होते. या सेमी फायनलची पहिली फेरी सिंधू सहज जिंकली परंतु दुसऱ्या फेरीत मात्र  रॅट्चनॉक इंटानॉन या तिच्या प्रतिस्पर्धीने तिला चांगलाच शह देण्याचा प्रयत्न केला परंतु सिंधूने आपल्या खेळाचे कौशल्य दाखवून हा डाव आपल्या नावे करून फायनल मध्ये धडक मारली.

या आधी तिने  उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या झँग बीवन हिचा  २१-९, २१-१५ अशा सरळ सेट मध्ये पराभव घडवून आणला. ह्याही डावात प्रथम फेरीत सिंधूने तिच्या प्रतिस्पर्धी  झँग बीवन हिला चांगलेच हरवले मात्र दुसऱ्या फेरीत सिंधूला विजयासाठी चांगलीच कसरत करावी लागली. परंतु दुसऱ्या फेरीत ती  सिंधूने झँग बीवन हीचा  २१-१५ सेट मध्ये पराभव घडवून आणला आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवला. त्या आधीच्या सामन्यात पी.व्ही. सिंधूने ताय झु यिंग हिचा पराभव घडवत  उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.
सलग सात वेळा विजयाने हुलकावणी दिल्या नंतर आज मिळालेला विजय हा  पी व्ही सिंधू साठी गिरी शिखरापेक्षा कमी नाही असेच म्हणावे लागेल.  गेम मधील पहिल्या सामन्यातील पिछाडी नंतर चायनीज तैपेईच्या ताय झु यिंगला पराभूत करणे अशक्य असल्याच्या मान्यतेला सिंधूने अमान्य केले आणि हा सामना सिंधूने  १४-२१, २१-१६, २१-१८ असा जिंकला होता.सिंधूच्या आजच्या विजयानंतर तिच्या चाहत्यांनी आणि भारतातील क्रीडा जाणकारांनी तिच्या विजया बद्दल अभिनंदन केले आहे.