Coronavirus : या महिन्याच्या शेवटी ‘कोरोना’ नष्ट होण्यास सुरुवात होईल, चीनच्या सर्वात मोठ्या वैज्ञानिकाचा ‘दावा’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  चीनमधून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील 180 पेक्षा अधिक देशांना याचा फटका बसला आहे. लाखो लोकांना संसर्ग झाला आहे तर हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर अनेक देश औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आता एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. येत्या चार आठवड्यात म्हणजेच एका महिन्यात कोरोना विषाणूचा नाश होईल असा दावा चीनमधील नामांकीत वैज्ञानिकाने केला आहे.

विषाणू फक्त चार आठवड्यात नष्ट होण्यास सुरुवात होईल

चीनेचे नामांकीत वैज्ञानिक डॉ. जोंग नानशान म्हणाले की, एप्रिलच्या अखेरीस कोरोना विषाणू नष्ट होण्यास सुरुवात होईल, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच या विषाणूची चीनला पुन्हा लागण होणार नाही. चीनी टिव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. डॉ. जोंग म्हणाले, जगातील अनेक देशांनी या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. या विषाणूला रोखण्यासाठी हेच मोठे पाऊल आहे. एप्रिलच्या अखेरीस या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो.

पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता कमी

चीनमधील वुहान शहरातील कोरोनापासून बरे झालेल्या लोकांमध्ये पुन्हा कोरोनाचा विषाणू सापडला आहे यावर बोलताना डॉ. जोंग म्हणाले, फार क्वचितच असे घडते. एखादा व्यक्ती बरा झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होण्याचे कारण म्हणजे शरिरात एन्टीबॉडीज असणे.

कोरोना विषाणूमुळे अमेरिका, इटली आणि संपूर्ण यूरोपसह जगामध्ये आतापर्यंत तब्बल 9.42 लोकांना लागण झाली आहे. अमेरिका आणि इटलीमध्ये साथीच्या आजाराने सर्वाधिक थैमान घातले आहे. अमेरिकेत आतापर्यंत 2.16 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. इटलीमध्ये 1.10 लाख लोकांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे.