31 मार्चपर्यंतच ‘BS – 4’ वाहनांची ‘विक्री’ करता येणार, वाहन कंपन्यांसाठी धक्कादायक निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 31 मार्चपर्यंतच बीएस – 4 वाहनांची विक्री करता येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे कार कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. 31 मार्च नंतर बीएस 4 वाहनांची विक्री करता येणार नाही. त्यानंतर फक्त बीएस – 6 इंजिन असलेल्या वाहनांची विक्री कंपन्या करु शकतात.

1 एप्रिल पर्यंत बीएस – 4 ची वाहने विकण्याची परवानगी मिळावी अशी मागणी वाहन निर्मिती कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयकडे केली होती. मात्र मुदत न वाढवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. तसेच 1 एप्रिल पासून फक्त बीएस 6 वाहनांची विक्री करता येईल असा निर्णय दिला आहे.

कार कंपन्यांची एप्रिलपर्यंत मुदत वाढीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. वाहन निर्मिती उद्योगांसाठी हा निर्णय धक्कादायक मानला जात आहे. भारतात अद्यापही बीएस – 4 वाहनांची विक्री होते. यापूर्वी देखील सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते की वाहन कंपन्यांनी बीएस – 5 आणि 6 या इंजिन असलेल्या वाहनांची निर्मिती करावी. परंतु त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाकडून त्या विरोधात याचिका दाखल केली होती.

कार कंपन्यांनी बीएस – 4 च्या वाहन विक्रीसाठी मुदत वाढवून मागितली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळत 31 मार्चपूर्वीच बीएस 4 वाहनांची विक्री करता येईल असे आदेश दिले आहेत. त्यानंतर फक्त बीएस 6 वाहनांचीच विक्री वाहन कंपन्यांकडून करण्यात येईल असे आदेशात म्हणले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like