राजकीय

…….तोपर्यंत मोदींना राज्यात पाऊल ठेवू देणार नाही

लातूर : पोलीसनामा आॅनलाईन-

जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा अखिल भारतीय छावा संखटनेने आज लातूरमध्ये दिला आहे. आयोजित पत्रकार परिषदेत छावा संघटनेचे नानासाहेब जावळे बोलत होते.
[amazon_link asins=’B01LXHKR4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’51ceac45-919a-11e8-855c-cdcb08862727′]

आमदारांनी दिलेल्या राजीनामा सत्रावर बोलताना जावळे म्हणाले की, आमदार-खासदारांनी राजीनाम्याचे स्टंट करुन नयेत. आरक्षणाची एवढीच काळजी असेल तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण करावं, असेही ते म्हणाले. सरकार चर्चेला तयार आहे, ही संकल्पनाच आम्हाला मान्य नाही, चर्चा वैगरे काही नको, आगोदर आरक्षणाचा निर्णय घ्या आणि नंतर चर्चा करा, अशी भूमिका छावाने घेतली आहे. याशिवाय शरद पवारांनी आरक्षणाबाबत ठोस भूमिका घ्यावी, वेळोवेळी भूमिका बदलू नये, असे नानासाहेब जावळे म्हणाले. या सर्व पार्श्वभूमीवर अखिल भारतीय छावा संघटनेने दिलेला ‘मोदींना महाराष्ट्र बंदी’ हा इशारा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे.

Back to top button