डिसेंबरअखेर मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाचे पूर्ण करणार : पालकमंत्री शिंदे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाच्‍यावतीने कर्जत येथे शंभर विद्यार्थींनींची क्षमता असलेले मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह इमारतीचे बांधकाम  डिसेंबरअखेर पूर्ण करण्‍यात येणार आहे, असे प्रतिपादन विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्‍या हस्‍ते कर्जत येथे  मागासवर्गीय मुलीं|च्‍या  वसतीगृहाचे  भूमिपूजन करण्‍यात आले  त्‍यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार दिलीप गांधी, कर्जत नगर परिषदेचे नगराध्‍यक्षा श्रीमती प्रतिभाताई भैलुमे, उपनगराध्‍यक्ष नामदेव राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियता सुरेश राऊत, समाज कल्‍याचे सहाय्यक आयुक्‍त पांडूरंग वाबळे तसेच कर्जत नगरपरिषदेचे नगरसेवक- नगरसेविका  आदि मान्‍यवर उपस्थित होते.

पालकमंत्री प्रा.शिंदे म्‍हणाले, कर्जत येथे शिक्षण चांगल्‍या दर्जाचे व कमी खर्चात मिळत असल्‍यामुळे कर्जतला विद्येचे माहेरघर म्‍हटले जाते.  सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाच्‍या वतीने शंभर विद्यार्थींनी क्षमता असलेल्‍या  मागासवर्गीय मुलींचे दोन मजली इमारतीस शासनाने 9 कोटी 31 लाख 61 हजार रुपये निधी मंजूर केले आहे.  या इमारतीमध्‍ये पहिल्‍या मजल्‍यावर डायनिंग हॉल, किचन रुमसह 12 हॉल व  दुस-या मजल्‍यावर  वाचनालय, व्‍यायाम रुमसह  14 हॉल मुलीकरीता  बांधण्‍यात येणार आहे.  वसतीगृहाचे काम लवकरच सुरु होऊन  माहे डिसेंबर 2019 अखेर पुर्ण करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी  सांगितले.

तसेच अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेला डिंभे- एडगाव पाणी प्रश्‍न सोडविण्‍यात आला असून  कर्जत येथे प्रशासकीय इमारतीस 217 कोटीच्‍या निधीस मान्‍यता देण्‍यात आली आहे.  जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत  करण्‍या आलेल्‍या कामामुळे कर्जतला पाणी उपलब्‍ध झालेले आहे.  या वर्षी पाऊस कमी पडल्‍यामुळे कर्जतकरांना  दुष्‍काळास सामारे जावे लागत आहे.  छावण्‍याचा प्रश्‍न लवकर मार्गी लागेल असेही त्‍यांनी यावेळी प्रा. शिंदे सांगितले.

खासदार श्री. गांधी म्‍हणाले, कर्जत येथे  मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह उभारल्‍यामुळे मागासवर्गीय मुलींना चांगल्‍या पध्‍दतीचे शिक्षण मिळणार आहे. कर्जत येथे येणा-या विद्यार्थीनी बाहेर जिल्‍हयातून येतात त्‍यांना वसतीगृहामुळे  चांगला फायदा होऊन चांगले विद्यार्थी येथे घडले जातील.  कर्जत नगरपरिषदेमध्‍ये  शासकीय योजना चांगल्‍या पध्‍दतीने राबविल्‍या जातात. त्‍यामुळे शहराच्‍या वैभवात निश्चितच भर पडेल असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला.

कार्यकारी अभियंता श्री.राऊत म्‍हणाले, मागासवर्गीय मुलींच्‍या शासकीय वसतीगृह  इमरतीचे बांधकाम आर सी सी फ्रेम स्‍ट्रक्‍चर, बाहेरील बाजूकरिता सॅन्‍ड फेस प्‍लास्‍टर, दरवाजे एम-40 आर सी सी फ्रेम व झडपाकरीता फलश डोअर व अॅल्‍युमिनीअस खिडक्‍या थ्रीटॅक प्रस्‍तावित आहेत.  जिन्‍याकरिता  स्‍टेनलेस स्‍ट्रील पाईप रॅलिग व पाय-या करीता ग्रॅनाईट वापरण्‍यात येणार आहे. तसेच पाणी पुरवठा व जलनिस्‍सारणाची  व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

यावेळी खा कर्जतच्‍या नगराध्‍यक्षा श्रीमती प्रतिभाताई भैलुमे, उपनराध्‍यक्ष नामदेव राऊत, अशोक खेडकर यांनीही  आपले मनोगत यावेळी व्‍यक्‍त केले.

प्रास्‍ताविकात समाज कल्‍याणचे सहाय्यक आयुक्‍त पांडूरंग वाबळे म्‍हणाले , सध्‍या मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह खाजगी जागेत आहे. कर्जत येथे शंभर विद्यार्थींनी क्षमता असलेले मागासवर्गीय मुलींचे  वसतीगृहाचे बांधकामापूर्ण  होऊन  शिक्षणासाठी उपलब्‍ध होणार आहे, असे  सांगितले.