संत निरंकारी मंडळाचे स्वयंसेवक पुरग्रस्तांच्या मदतीला आले धावून..आपत्ती समयी कात्रज परिसरामध्ये स्वच्छता अभियान संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – संत निरंकारी मंडळ, पुणे झोनच्या माध्यमातून कात्रज परिसरातील के.के. मार्केट, अरण्येश्वर, धायरी, रायकर मळा, वडगाव, टांगेवाला कॉलोनी येथे आज शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ :०० ते १२:०० या वेळेत स्वच्छता अभियान संपन्न झाले.

या मदत कार्यामध्ये पिंपरी, भोसरी, आळेफाटा, जुन्नर, घोडेगाव, नारायणगाव विभागातून पूरग्रस्त परिसरामध्ये जाऊन संत निरंकारी मंडळाचे सेवादल तसेच चॅरिटेबल फाऊंडेशन च्या ३०० हून अधिक स्वयंसेवकानी सर्व परिसर स्वच्छ केला.

बुधवार, दि. २५ सप्टेंबर २०१९ रात्री पुण्यात झालेल्या (ढगफुटी) आकस्मित पावसामुळे कात्रज परिसरात पाणी साचले होते. रात्री उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे के.के. मार्केट, अरण्येश्वर, धायरी, रायकर मळा, वडगाव, टांगेवाला कॉलोनी येथे १० फूट हुन अधिक उंचीवर पाणी साचले होते. अनेक सोसायट्यांचे पार्किंगमध्ये पाणी भरले तसेच अनेक घरे देखील कोसळली. रस्त्यावर पार्किंग करण्यात आलेल्या अनेक गाड्या वाहून गेल्या.

परिसरात राहणाऱ्या लोकांचे संसार उध्वस्त झाले असून लोक या परिस्थितीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.  पाऊस ओसरल्यापासून संत निरंकारी फाऊंडेशनचे स्वयंसेवक अविरत सेवा निभावत आहेत. मागील महिन्यात कोल्हापूर, सांगली या भागात आलेल्या पूर परिस्थिती मध्ये देखील संत निरंकारी मंडळातर्फे कोल्हापूरमधील वळिवडे, प्रयाग, चिखली या ठिकाणी मदत कार्य करण्यात आले होते.

Visit : Policenama.com