Byculla District Jail | भायखळा कारागृहात महिला बंद्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ‘नन्हे कदम’ बालवाडी व हिरकणी कक्ष, राज्यातील पहिलाच उपक्रम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भायखळा जिल्हा कारागृह (Byculla District Jail) परिसरामध्ये कारागृहाच्या बाहेर महिला बंद्यांच्या व कारागृह कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ‘नन्हे कदम’ (Nanhe Kadam) बालवाडी (Nursery) व हिरकणी कक्षाची (Hirakni Room) स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील कारागृह विभागात पहिल्यांदाच भायखळा जिल्हा कारागृह (Byculla District Jail) हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या बालवाडी आणि हिरकणी कक्षाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.13) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारगृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता (ADG Amitabh Gupta) यांच्या हस्ते झाले. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, भायखळा योगेश देसाई (DIG Yogesh Desai) उपस्थित होते.

 

भायखळा जिल्हा कारागृहामध्ये (Byculla District Jail) सरासरी 350 महिला बंदी बंदीस्त असतात. यामध्ये 0 ते 6 वयोगटातील जवळपास 14 ते 15 मुले आईसोबत कारागृहात येतात. या मुलांना दररोज कारागृहाबाहेरील वातावरणात शिक्षणाची संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या एकात्मीक बाल विकास कार्यक्रमांतर्गत महिला सेविका व मदतनिस यांनी नेमणुक करण्यात आली आहे. त्यांच्या मार्फत बंद्यांच्या लहान मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जात आहे.

मुंबई जिल्हा महिला कारागृह व ‘आंगन’ या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने
‘नन्हे कदम’ बालवाडी व हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
यामुळे महिला बद्यांच्या मुलांसोबत महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या लहान मुलांसाठी पाळणा घराची व्यवस्था झाली झाली आहे.
अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प भायखळा जिल्हा कारागृहात राबविण्यात आला आहे.
याचा महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

 

यावेळी कारगृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता आणि कारागृह दक्षिण विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आंगन संस्थेच्या संचालिका डॉ. स्मती धर्मामेर, प्रयास संस्थेचे संचालक डॉ. विजय राघवन,
मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचळ,
भायखळा जिल्हा कारागृहाच्या अधीक्षीका पल्लवी कदम,
वरिष्ठ तुरुंगाधिकारी ए.टी. पाटील इत्यादी उपस्थित होते.

Web Title :- Byculla District Jail | ‘Nanhe Kadam’ Kindergarten and Hirakni Room for the children of women inmates and staff at Byculla Jail, a first-of-its-kind initiative in the state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Gauri Khan | गौरी खान तिच्या लूकमुळे होते वायरल; चाहते करत आहेत कौतुक

Pune Unauthorized School | ‘त्या’ शाळांवर गुन्हा दाखल करा, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

Pune Crime News | 50 लाखांच्या खंडणीसाठी मुंबईतील 3 बिल्डरचे पुण्यातून अपहरण, गुन्हे शाखेकडून काही तासात सुटका; तिघांना ठोकल्या बेड्या