US Elections : चर्चेचा विषय ठरला ट्रम्प यांचा ‘तो’ फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक म्हणजे देशाचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे. राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी येत्या बुधवारपासून सुरू होणार आहे. सध्या अमेरिकन जनतेचा कौल बायडेन विजयी होणार याकडे आहे. आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव जवळजवळ निश्चित आहे.

परंतु, निकाल लागण्याआधीच सध्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या निवडणुकीमध्ये मतमोजणीच्या वेळी घोटाळा झाल्याचे आरोप केले आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. तसेच मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्यासाठी न्यायालयामध्ये धावही घेतली. परंतु, जॉर्जिया आणि मिशिगन मधल्या न्यायाधीशांनी डोनाल्ड ट्रम्प यांची याचिका फेटाळून लावली. ट्रम्प यांनी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच वेगवेगळे दावे करण्यास सुरुवात केली. सध्या ट्रम्प ही निवडणूक आधीच जिंकल्याच्या आविर्भात सुद्धा आहेत. असे असले तरी ते व्हाइट हाउसमधून सामान बांधण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसत. परिणामी, ट्रम्प यांचा पराभवावर शिकामोर्तब झाला आहे.

ट्विटकरी ही जोरात ….

– ट्विटवर अनेकांनी ‘बाय बाय ट्रम्प’ अशा पद्धतीचा हॅशटॅग ट्रेण्ड केला आहे.
– एका ट्विटमध्ये पत्रकार असणाऱ्या डायना ग्रेसन यांनी व्हाइट हाउसचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये व्हाइट हाउसच्या मुख्य इमारतीसमोर पॅकर्स अ‍ॅण्ड मुव्हर्सचा एक मोठा ट्रक उभा असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना डायना यांनी, “सामान बांधायला घ्या ट्रम्प, आम्ही आमचं घर परत ताब्यात घेतोय,” असं म्हटलं आहे.

ट्रम्प यांचा तो ‘फोटो’
या फोटोमध्ये व्हाइट हाउसच्या मुख्य इमारतीसमोर पॅकर्स अ‍ॅण्ड मुव्हर्सचा एक मोठा ट्रक उभा असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना डायना यांनी, “सामान बांधायला घ्या ट्रम्प, आम्ही आमचं घर परत ताब्यात घेतोय,” असं म्हटलं आहे.