सीएचा निकाल जाहीर, जयपूरचा अतुल अग्रवाल देशभरातून प्रथम

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन

‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’तर्फे (आयसीएआय) घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल ऑनलाइन पद्धतीने आज,शुक्रवारी जाहीर होणार झाला आहे. या परीक्षेमध्ये देशभरातून अतुल अग्रवाल प्रथम आला आहे.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’35086203-8cae-11e8-8df3-8b225ee7280a’]

‘आयसीएआय’तर्फे मे आणि जून २०१८ मध्ये सीए अभ्यासक्रमासाठी सीपीटी, फाउंडेशन आणि फायनल परीक्षा घेण्यात आली होती. फायनल परीक्षा आणि फाउंडेशन परीक्षेतील देशभरातील ५० गुणवंत विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. ही गुणवत्ता यादी संस्थेच्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. यंदा जुन्या अभ्यासक्रमानुसार १,२१,८५० विद्यार्थ्यांनी फायनल परीक्षा दिली होती.नव्या अभ्यासक्रमानुसार ५,४०६ विद्यार्थ्यांनी फायनल परीक्षा दिली आहे. सीपीटी परीक्षेसाठी ५७,४२१ विद्यार्थी बसले होते, तर ६,७८८ विद्यार्थ्यांनी फाउंडेशन परीक्षा दिली होती. सुधारित अभ्यासक्रमामध्ये ४०३३ विद्यार्थ्यांमधील १३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या अभ्यासक्रमानुसार बंगळूर चा अभिषेक नागराज दुसरा आणि उल्हासनगर ची समीक्षा अग्रवाल तिसरी आली आहे.

या तिन्ही परीक्षांचा निकाल विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेलवरही मिळू शकणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना icaiexam.icai.org या वेबसाइटवर नावनोंदणी करावी लागणार आहे. इतर विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी या वेबसाइटसवर त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा पिन क्रमांक आणि रोल नंबर टाकावा लागणार आहे. ‘इंडिया टाइम्स’च्या माध्यमातून मोबाइलवर एसएमएसद्वारे निकाला पाहता येणार आहे. या परिक्षेमध्ये जयपूर चा अतुल अग्रवाल आणि सुरज प्रीत शहा प्रथम आले आहेत. आगम दलाल देशात दुसरा तर अनुराग भदौरिया देशात तिसरा आला आहे.