ED च्या चौकशीच्या भीतीने CA ची आत्महत्या !

ठाणेः पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील तब्बल चार हजार कोटीचा घोटाळा असलेल्या कॉक्स अ‍ॅन्ड किंग्ज लि. ट्रनर मॉडीसन या आंतरष्ट्रीय टूर्स कंपनीचा लेखापालाने (सीए) अंमलबजावणी संचालनालय (ईडी ) आणि मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु असलेल्या चौकशीचा ससेमीरा आणि भीतीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सागर सुहास देशपांडे (वय 38, रा. चरई ठाणे) असे आत्महत्या केलेल्या लेखापालाचे (सीए) नाव आहे.हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहारामुळे या कंपनीच्या काही संचालकांना अटक झाली आहे. यासंबधी कंपनीवर तीन वेगवेळे गुन्हे दाखल आहेत. त्यातच कंपनीचा सीए सागरचीही याच प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झाली होती. पुन्हा 13 ऑक्टोंबरलाही त्याला बोलावले होते. तत्पूर्वी 11 ऑक्टोंबर रोजी टिटवाळा येथे जाऊन येथे असे वडीलांना सांगून तो घरातून बाहेर पडला होता. मात्र 12 ऑक्टोंबर रोजी त्याने कल्याण परिसरात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. तब्बल पाच दिवसांनी म्हणजे 17 ऑक्टोंबर रोची त्याच्या मृत्यूची माहिती कुटुंबियांना मिळाली.

दरम्यान आपल्याला केंव्हाही अटक होऊ शकते, या भीतीने सागरला ग्रासले होते. याबाबत त्याने काही मित्राकडे बोलूनही दाखलवे होते. यातूनच त्याने आत्महत्येचा विचार केला. पण त्याआधी टिटवाळा येथील घराच्या भाडेकराराचे नुतणीकरण आणि त्या घरासाठी वारस नोंदणीसाठी त्याने विचारपूस केल्याचे समजते. घटस्फोटीत असलेला सागर वारस म्हणून कोणाची नोंद करणार होता, हे मात्र समजू शकले नाही.

दोन आठवडयापूर्वीच आत्महत्येचा निर्णय
घराला वारस नोंदणीसाठी काय करावे लागेल, अशी विचारणा सागरने त्याच्या भाडेकरूकडे केली होती. सोसायटीच्या सेक्रेटरीकडे अथवा बिल्डरकडे तशी नोंदणी करावे लागेल असा सल्ला भाडेकरूने दिला होता. यावरून दोन आठवड्यापर्वीच त्याने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.